हातगाडी चालकाकडे चॉपरच्या धाकावर दोन हजारांच्या खंडणीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST2021-03-10T04:40:23+5:302021-03-10T04:40:23+5:30

ठाणे : हातगाडी चालकाकडे चॉपरच्या धाकावर दोन हजारांच्या खंडणीची वसूल करणाऱ्या सितापराव ऊर्फ बंटी व त्याचे साथीदार गणेश निकम, ...

The driver of the handcart recovered a ransom of Rs 2,000 at the behest of the chopper | हातगाडी चालकाकडे चॉपरच्या धाकावर दोन हजारांच्या खंडणीची वसुली

हातगाडी चालकाकडे चॉपरच्या धाकावर दोन हजारांच्या खंडणीची वसुली

ठाणे : हातगाडी चालकाकडे चॉपरच्या धाकावर दोन हजारांच्या खंडणीची वसूल करणाऱ्या सितापराव ऊर्फ बंटी व त्याचे साथीदार गणेश निकम, विक्की सोलंकी आणि इतर अशा चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. यातील सितापराव याला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोपरीतील शिवमंदिराजवळ असलेल्या भाजी मार्केट येथे ५ मार्च रोजी इंदर मोटवाणी (५२, रा. कन्हैयानगर, ठाणे) हे हातगाडीवर भजीविक्री करीत होते. त्याच वेळी सितापराव ऊर्फ बंटी आणि त्याचे साथीदार तिथे आले. त्यांच्यापैकी बंटी याने चॉपर काढून हातगाडीच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीवर आपटून इंदर याला दारू पिण्यासाठी दोन हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ‘दो हजार रुपये दे, नहीं तो यही पर काट दूँगा’ अशी धमकी देत शिवीगाळी केली. इंदर यांच्यावर चाल करीत त्याच्या इतर साथीदारांनी भाजी मार्केट तात्पुरत्या स्वरूपात बंद केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बंटी याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: The driver of the handcart recovered a ransom of Rs 2,000 at the behest of the chopper