करिअर मेळाव्यात जलमित्र अभियान!

By Admin | Updated: May 24, 2016 02:15 IST2016-05-24T02:15:32+5:302016-05-24T02:15:32+5:30

एमकेसीएल अधिकृत आॅल इन वन कॉम्प्युटर सेंटर व वेदांग मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये

Dramatic campaign for career gathering! | करिअर मेळाव्यात जलमित्र अभियान!

करिअर मेळाव्यात जलमित्र अभियान!

ठाणे : एमकेसीएल अधिकृत आॅल इन वन कॉम्प्युटर सेंटर व वेदांग मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानास भरघोस प्रतिसाद मिळाला. या वेळी जास्तीतजास्त लोकांपर्यंत अभियान पोहोचवण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली.
या वेळी एमकेसीएलचे जॉब ओरिएण्टेड केएलजेसी कोर्सेस यांचे मार्गदर्शन सेमिनारदेखील पार पडले. प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या अनिल सूर्यवंशी व प्रीतम निर्मले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग गायकवाड व हरीश देसले उपस्थित होते. माणिक पाटील, बाळू घुडे, संजय माळी यांच्याबरोबर अस्पायर नेटवर्क्स प्रा.लि.चे आनंद वैद्य आणि श्रीम आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.चे प्रतिनिधी सुधीर शेजवळ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी हातभार लावल्याबद्दल या वेळी ‘लोकमत’चे आभार मानले.

Web Title: Dramatic campaign for career gathering!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.