नालीचे पाणी शाळेच्या पटांगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:28 IST2021-09-02T05:28:12+5:302021-09-02T05:28:12+5:30

उल्हासनगर : महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे नालीचे पाणी नालंदा शाळेच्या पटांगणात जमा झाल्याने शिक्षक व स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. ...

Drainage water in the school yard | नालीचे पाणी शाळेच्या पटांगणात

नालीचे पाणी शाळेच्या पटांगणात

उल्हासनगर : महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे नालीचे पाणी नालंदा शाळेच्या पटांगणात जमा झाल्याने शिक्षक व स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. या नालीची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिक व समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी बुधवारी महापालिकेकडे केली.

कॅम्प नं- ४ दहाचाळ येथील नालंदा शाळेजवळील नालीतील पाणी शाळेच्या प्रांगणात आले. सांडपाण्याचा त्रास येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह शिक्षकांना होत आहे. शाळा बंद असल्याने मुले शाळेत येत नाहीत. मात्र शाळा सुरू होण्यापूर्वी नालीचे बांधकाम करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी महापालिकेला याबाबत निवेदन देऊन नालीचे काम करण्याची मागणी केली. यापूर्वी महापालिका प्रभाग क्रं- ७ येथील नाली व रस्त्याचे निकृष्ट काम मनसेचे प्रवीण माळवे यांनी उघड केले होते. महापालिका अभियंता संदीप जाधव यांनी याबाबतची दखल घेऊन, निकृष्ट बांधकाम प्रकरणी ठेकेदाराला नोटीस देऊन पुन्हा काम करण्याचे सुचविले. काम न केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Drainage water in the school yard