शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

'10 मे पर्यंत सर्व प्रभागातील नालेसफाई पूर्ण झालीच ‍पाहिजे' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 14:42 IST

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ठाणे शहरातील सर्व प्रभागातील नालेसफाई करण्यात येते.

ठाणे - महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहीम राबविली जाते. मात्र गेल्यावर्षीपासून पावसाची अनियमितता लक्षात घेता यावर्षी सर्व प्रभागातील नालेसफाई ही 10 मे पर्यंत पूर्ण झालीच पाहिजे असे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देत नालेसफाई मोहिमेसाठी असलेली निविदा प्रक्रिया 15 एप्रिलपर्यत पूर्ण करावी अशा सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या.    

महापौर दालनात झालेल्या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रविंद्र खडताळे, मुख्य लेखा व  ‍वित्त अधिकारी मनेष वाघीरकर, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उपनगर अभियंता रामकृष्ण कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे शंकर पाटोळे तसेच सर्व प्रभाग समित्यांचे कार्यकारी अभियंता या बैठकीस उपस्थित होते.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ठाणे शहरातील सर्व प्रभागातील नालेसफाई करण्यात येते. परंतु यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया उशीरा होत असल्याने पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाई पूर्ण होत नाही. यामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पर्यायाने लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यासाठी नालेसफाईसाठी सर्व प्रभागसमितीकडून नालेसफाईच्या नस्ती 15 मार्चपर्यंत घनकचराविभागाकडे सादर कराव्यात व ही सर्व प्रक्रिया 15 एप्रिलपर्यत पूर्ण करुन लगेच नालेसफाई मोहीम हाती घेण्यात यावी अशा सूचना या बैठकीत महापौरांनी दिल्या.

दरम्यान, उपायुक्त स्तरावर सर्व प्रभागसमितीत कार्यरत असलेल्या स्वच्छता निरिक्षकांची तातडीने बैठक घेवून प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील गटारांची साफसफाई करण्याचे आदेश द्यावेत. नाल्याप्रमाणे गटारेही साफ होणे गरजेचे असून गेल्यावषी  झालेल्या पावसाळ्यात शहरातील कोणत्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या मागची कारणे काय आहेत, याचा आढावा घेवून त्या ठिकाणी पाणी साचणार नाही अशा उपाययोजना करण्यात याव्यात असेही या बैठकीत सांगण्यात आले. महापालिका प्रशासन हे नियमित काम करीत असते. परंतु एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होवून नालेसफाई न झाल्याचे आरोप देखील केले जातात, अशा तक्रारी येवू नयेत यासाठी 10 मे पर्यत सर्व प्रभागस्तरावरील नाल्यांची साफसफाई करण्यात यावी व त्या दृष्टीने सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत सर्व  अधिकाऱ्यांना महापौरांनी  बैठकीत संबोधित केले.

वास्ताविक पाहता, वर्षातून दोन वेळा नालेसफाई होणे आवश्यक आहे,  या वर्षापासून वर्षातून दोनदा नालेसफाई व्हावी या दृष्टीने नियोजन करुन सन 2020 -21 च्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद ठेवावी असे आदेशही महापौर यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाRainपाऊस