शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

डाॅ. मेधा खोले आणि त्या अधिका-याला तत्काळ निलंबित करा, आ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 21:17 IST

पुरोगामी महाराष्ट्रात सोवळे सोडून स्वयंपाक केला म्हणून एका बहुजन समाजातील स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.  असा गुन्हा दाखल करणारी खोले आणि गुन्हा दाखल करणारा संबधित पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ठाणे, दि. 8 - पुरोगामी महाराष्ट्रात सोवळे सोडून स्वयंपाक केला म्हणून एका बहुजन समाजातील स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. असा गुन्हा दाखल करणारी खोले आणि गुन्हा दाखल करणारा संबधित पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या पावसात लोकांनी एकमेकांना हात देऊन जीव वाचविले. त्यावेळी कुठेच जात दिसली नव्हती.  त्यावेळी फक्त माणुसकी ही एकच जात दिसली होती. आता या खोलेबाईने जातीपातीची मुळे किती खोलवर गेली आहेत. हे दाखवून दिले आहे. पाच वेळा केलेले जेवण आवडल्यानंतर यादव नावाच्या महिलेला नोकरीवर ठेवले होते. आता अचानक निर्मला यादव हिची जात उघडकीस  आल्याने खोलेबाईचा धर्म भ्रष्ट झाला आहे. यावरून विशिष्ट लोकांच्या मनात जात किती घट्ट आहे, हे दिसत आहे. जे काल पर्यंत जात मानत नाही,  असे बोलत होते. ते आता सोवळे सोडल्याचा कांगावा करून जर गुन्हा दाखल करीत असतील तर ते सहन केले जाणार नाही.  तसेच ज्या मुर्ख पोलीस अधिकार्याने हा गुन्हा दाखल केला आहे. त्याची ओळख संबंध महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे. म्हणूनच त्याला आता तातडीने निलंबित करण्यात आले पाहिजे, असे आ. आव्हाड  यांनी म्हटले आहे. दरम्यान,  अशा प्रकारचा जातीयवाद  आता महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. आज स्वयंपाक बंदी केली आहे. उद्या मंदिरात जाण्यास बंदी घातली जाईल.; पाणी पिण्यास बंदी घातली जाईल; रस्त्यावर चालण्यास बंदी घातली जाईल.   ऐन केन प्रकारे संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न मनुवादी मानसिकतेकडून सुरू आहे. संविधानाने दिलेली समानता मोडीत काढून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा डाव आखला जात आहे. पण, संविधानाला जर हात लावला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,  असा इशाराही आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.