शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ‘आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सव’ २०१८चे उद्घाटन संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 3:57 PM

५ जूनपर्यंत आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सवात अनेक कार्यक्र मही ठेवण्यात आले आहेत. तीनही दिवस दुपारच्या सत्रांमध्ये टाऊन हॉल येथे लघू चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देडॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटनआपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सव’ २०१८प्रत्येक माणसांपर्यंत पर्यावरणाचे प्रेम, महत्त्व पोहोचावे - डॉ. महेंद्र कल्याणकर

ठाणे : महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, वनविभाग ठाणे आणि पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित ‘आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सव’ २०१८चे उद्घाटन टाऊन हॉल येथे डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाले. आज पर्यावरण दक्षता मंडळासारख्या सामाजिक संस्था या पर्यावरणासाठी इतके भरीव योगदान देत असल्याबद्धल जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर यांनी गौरावोद्गार काढले.    सर्व पर्यावरण प्रेमींच्या दृष्टीने आवडीच्या आणि माहितीपूर्ण अशा ‘आपलं पर्यावरण’ या चित्रपट महोत्सवास आजपासून येथील टाऊन हॉल येथे सुरु वात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाले.  डॉ. कल्याणकर म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रचार प्रसार पर्यावरण दक्षता मंडळाने १९ वर्षांपुर्वी केला आणि त्याचा परिणाम आता दिसत आहे. समाजातील प्रत्येक माणसांपर्यंत पर्यावरणाचे प्रेम, महत्त्व पोहोचावे अन्यथा पुढच्या पिढीला काय मिळेल हे सांगणे कठिण आहे. पर्यावरणप्रेमी संस्थांनी एकत्र येऊन पर्यावरणाचे प्रेम निर्माण केले पाहिजे. जिल्ह्यात कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी काटेकोर पाऊले उचलण्यात येत असून प्रथमच दोन ठिकाणी कांदळवनाची लागवड करण्यात आली. येत्या काळात कांदळवनाचे प्रमाण वाढलेले दिसेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कांदळवन लागवडी सारखे उपक्रम राबविण्यासाठी पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढे यावे अशा संस्थांना या उपक्रमांसाठी निधी पुरविला जाईल असे सांगत जिल्ह्यातील प्रत्येक झाडाचे जिओ टॅगिंग करण्यात आल्याचे सांगत यावर्षी ठाणे जिल्ह्यात ३३ लाख झाडे लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी बोलतांना पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रा. विद्याधर वालावलकर यांनी पर्यावरणासारख्या संवेदनशील विषयावर चित्रपट निर्मिती करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्र म असल्याचे सांगितले. जैवविविधता, पर्यावरण संरक्षण यासाठी या चित्रपटांचा मोठा हातभार लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जून महिन्याच्या ‘आपलं पर्यावरण’ या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी नाबार्डचे निवृत्त मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ अशोक मेथील, सुजय पत्की, डॉ संजय जोशी यांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :thaneठाणेenvironmentवातावरणMumbaiमुंबई