दिव्यात हुंडाबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:46 IST2021-08-17T04:46:41+5:302021-08-17T04:46:41+5:30

मुंब्रा : नवऱ्याकडून वारंवार करण्यात येणारी पैशांची मागणी, तसेच त्यासाठी करण्यात येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आचल सिंग ...

Dowry sacrifice in the lamp | दिव्यात हुंडाबळी

दिव्यात हुंडाबळी

मुंब्रा : नवऱ्याकडून वारंवार करण्यात येणारी पैशांची मागणी, तसेच त्यासाठी करण्यात येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आचल सिंग या २६ वर्षांच्या महिलेने १२ ऑगस्टला गळफास लावून आत्महत्या केली. ती दिव्यातील नारायणनगर परिसरातील साईधाम हाइट्स या इमारतीमध्ये राहत होती. तिचा पती सतेंद्र सिंग लग्नात हुंडा कमी दिला, तसेच नवीन घर घेण्यासाठी २०१९ पासून तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यास नकार दिल्यामुळे तो तिला त्रास देत होता. ही बाब तिने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर, त्यांनी दोन वेळा त्याला एकूण ९० हजार रुपये दिले होते. त्यानंतरही तो तिच्याकडे पैशांची मागणी करत होता, अशी तक्रार आचलचे वडील लालमन सिंग यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली असून, या प्रकरणी सतेंद्र याला शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Dowry sacrifice in the lamp