केबल आॅपरेटरला डोंबिवलीत मारहाण

By Admin | Updated: July 24, 2016 03:40 IST2016-07-24T03:40:41+5:302016-07-24T03:40:41+5:30

भाजपा नगरसेविका रविना माळी यांचे पती व दिराने केबल व्यावसायिक सावन दत्तू माळी या केबल व्यावसायिकाला त्यांच्या कार्यालयात मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी

Doublvital assault on cable operator | केबल आॅपरेटरला डोंबिवलीत मारहाण

केबल आॅपरेटरला डोंबिवलीत मारहाण

डोंबिवली : भाजपा नगरसेविका रविना माळी यांचे पती व दिराने केबल व्यावसायिक सावन दत्तू माळी या केबल व्यावसायिकाला त्यांच्या कार्यालयात मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत सावन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सावन यांचा २५ वर्षांपासून केबलचा व्यवसाय आहे. भाजपा नगरसेविका माळी यांचे दीर संदीप माळी व पती अमर माळी यांनी सावन यांना शनिवारी सकाळी कार्यालयात बोलावून घेतले. त्यांनी सावन यांच्याकडे केबल व्यवसायातील ५० टक्के हिस्सा मागितला. त्यास सावन यांनी नकार दिला. तो राग मनात धरून सावन यांना संदीप माळी, अमर माळी व अन्य दोघांनी जबर मारहाण
केली. या मारहाणीत सावन हे
जखमी झाले आहे. यासंदर्भात सावन यांनी मानपाडा पोलिसात तक्रार दिली आहे.
दरम्यान, संदीप माळी यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते त्यात म्हणतात की, त्यांना सावन यांच्याकडून मारहाण झाली आहे.
यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दोन्ही जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन्ही गटांकडून तक्रार प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Doublvital assault on cable operator