शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही अमिषाला बळी पडू नका- विवेक फणसळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 21:02 IST

चांगल्या कार्याची दखल ही निश्चितच घेतली जाते. कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. कोरोनाची दुसरी लाट सहज घेऊ नका. आपल्या कुटूंबियांसह नागरिकांची आणि स्वत:चीही काळजी घ्या, असा सल्ला ठाण्याचे मावळते पोलीस आयुक्त तथा राज्याच्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर यांनी आपल्या पोलिसांना बुधवारी दिला.

ठळक मुद्दे३१ पोलिसांना डीजी सन्मानचिन्ह प्रदान कोरोनाचे वाईट दिवसही जातील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चांगल्या कार्याची दखल ही निश्चितच घेतली जाते. कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. कोरोनाची दुसरी लाट सहज घेऊ नका. आपल्या कुटूंबियांसह नागरिकांची आणि स्वत:चीही काळजी घ्या, असा सल्ला ठाण्याचे मावळते पोलीस आयुक्त तथा राज्याच्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर यांनी आपल्या पोलिसांना बुधवारी दिला. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३१ पोलिसांना त्यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १४ अधिकाऱ्यांसह ३३ पोलिसांना सलग १५ वर्ष उत्कृष्ठ सेवा बजावल्याबद्दल महाराष्टÑ दिनी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. हे सन्मानचिन्ह (३३ पैकी ३१) या कर्तबगार अधिकारी कर्मचाऱ्यांना बहाल केल्यानंतर त्यांच्याशी हितगुज साधतांना फणसळकर पुढे म्हणाले, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची ही पोचपावती आहे. त्यामुळे चांगल्या कामाची दखल ही निश्चितच घेतली जाते. शासनाने ज्यांच्या संरक्षणाची तसेच कायदा सुव्यवस्थेची धुरा तुमच्यावर सोपविली आहे, ती चांगल्या तºहेने पार पाडा. कोरोनाची दुसरी लाट सहज घेऊ नका. स्वत: बरोबरच आपल्या कुटूंबाचीही काळजी घ्या. योग्य आणि आयोग्य हे ठरविता आले पाहिजे. कोरोना काळात ठाणे पोलिसांनी खूप धैर्याने काम केले. यापुढेही अशाच प्रकारचे काम करावे लागेल. महासंचालक पदक मिळाले तसेच आणखी उत्कृष्ठ काम करुन राष्टÑपती पदकालाही गवसणी घाला. उत्तम आरोग्य ठेवा, कोरोनाचा हा वाईट काळजी जाईल. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.* पोलीस सेवेत गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी, निरीक्षक संजू जॉन, दिलीप रासम, उपनिरीक्षक विजय उपाळे, संजय गळवे, रमेश जाधव, जमादार रामसिंग चव्हाण, स्रेहा करनाळे, विजयकुमार राठोड, अशोक राणे, सुरेंद्र पवार, संजय सातुर्डेेकर, विजय उगले तसेच हवालदार मोहन चौधरी, रवींद्र पाटील, मच्छींद्र पगारे आणि सुभाष मोरे आदी ३१ जणांना हे पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह फणसळकर यांनी प्रदान केले.* हे सन्मानचिन्ह योगायोगाने मंगळवारी महासंचालकपदी बढती मिळालेल्या फणसळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्यामुळे सन्मानचिन्ह प्राप्त पोलिसांनीही समाधान व्यक्त केले.* यावेळी सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अतिरिक्त आयुक्त प्रविण पवार, संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस