डोंबिवलीचे आधारकार्ड केंद्र सुरुच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:50 IST2018-02-16T17:47:49+5:302018-02-16T17:50:58+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उपविभागीय इमारतीमधील आधारकार्ड केंद्र गुरुवारी बंद पडले. ते पुन्हा सुरु व्हावे नागरिकांची आबाळ दूर व्हावी यासाठी ते आधारकार्ड केंद्र सुरु करण्यात यावे यासाठी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. नागरि सुविधांचे राजकारण करु नका असे सांगत त्यांनी महापालिका अधिका-यांना तात्काळ सुरु करण्याच्या सूचना दिल्या.

आधारकार्ड केंद्र
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उपविभागीय इमारतीमधील आधारकार्ड केंद्र गुरुवारी बंद पडले. ते पुन्हा सुरु व्हावे नागरिकांची आबाळ दूर व्हावी यासाठी ते आधारकार्ड केंद्र सुरु करण्यात यावे यासाठी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. नागरि सुविधांचे राजकारण करु नका असे सांगत त्यांनी महापालिका अधिका-यांना तात्काळ सुरु करण्याच्या सूचना दिल्या. त्यानूसार त्यांनी तातडीने ते केंद्र सुरु करण्यासाठी पुढाकार घेत संबंधित अधिका-यांशी चर्चा करत केंद्र चालवणा-या कौस्तुभ डोंगरे यांस नागरिकांसाठी सेवा सुरु करण्याचा आग्रह धरला.
कोणीही टिकाटीपण्णी करत असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करुन हे केंद्र तातडीने सुरु करावे. टोकन पद्धती हीमहापालिकेतच सुरु राहणार असून त्यासाठी नागरिकांनी अन्यत्र जाण्याची गरज नाही. महापालिकेतच पहिल्या मजल्यावर टोकन दिले जाईल, जेणेकरुन आधारकार्ड सुविधा मिळवतांना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी महापालिकेनेच घ्यायला हवी असा पवित्रा मोरेंनी घेतला. तसेच आजच्या आजच ही सुविधा सुुरु व्हावी, केंद्र चालवणा-या डोंगरे यांस नाहक कोणी त्रास देऊ नये असे आवाहन मोरेंनी केले. आधारकार्ड केंद्र ही सुविधा आवश्यक असून नागरिकांच्या भावनांशी कोणीही खेळू नये. नागरिकांना त्रास होता कामा नये. सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहणार असल्याचेही ते म्हणाले.
त्यानूसार मोरेंनी महापालिकेच्या कल्याण येथिल मुख्यलायात जाऊन आधारकार्ड केंद्र तातडीने सुरु करण्यासंदर्भात हालचाली केल्या. शुक्रवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास बंद पडलेले केंद्र पुन्हा सुरु करण्यात आल्याचे मोरे म्हणाले. आता केंद्र बंद पडणार नाही, उलट येथे आधारकार्डची सुविधा देणारी यंत्र, त्यासाठीचे कुशल कामगार आदींसह अन्य तांत्रिक बाबी जास्तीत जास्त संख्येने कशा वाढवता येतील यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या सुविधेत कोणीही राजकारण आणू नये असे आवाहन मोरेंनी करत शुभारंभ कोणी केला हे बघण्यापेक्षा त्या सुविधेत सातत्य कसे राहील, नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशी मिळेल याकडेही यंत्रणांनी लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.
* या आधारकार्ड केंद्राचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर वीस दिवस ते सुरु होते, परंतू प्रचंड गर्दीमुळे महापालिकेच्या कारभारावर परिणाम होऊ शकतो यासाठी नागरिकांनी राज्यमंत्र्यांच्या सावरकररोड येथिल कार्यालयानजीक जावून टोकन घ्यावे असा फतवा केंद्रचालकाने काढला. त्यास विरोध झाला, आणि त्यामुळे केंद्र गुरुवारी बंद ठेवावे लागले. पण शुक्रवारी तातडीने त्याची दखल घेत मोरेंनी केंद्र सुरुच ठेवावे, बंद ठेवणे योग्य नाही असा पवित्रा घेत ते पुन्हा सुरु केले. यासगळया नाट्यमय घडामोडीमुळे शिवसेना भाजपाच्या मदतील धावून आल्याची चर्चा सुरु होती. तसेच या सुविधेचे कोणी राजकारण करु नये असेही मोरे म्हणाले यावरुन त्यांनी नकळतपणे भाजपाला टोला लगावल्याचीची महापालिका वर्तूळात चर्चा सुरु होती.