शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत इंडियन फेस्टिव्हल ऑफ ऑर्टला आजपासून सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 19:22 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इंडियन फेस्टीवल ऑफ आर्ट 2018 या फेस्टिव्हला आजपासून सुरूवात झाली आहे. या संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये 150 ते 200 कलाकार सहभाग घेणार आहेत. 

कल्याण : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इंडियन फेस्टीवल ऑफ आर्ट 2018 या फेस्टिव्हला आजपासून सुरूवात झाली आहे. या संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये 150 ते 200 कलाकार सहभाग घेणार आहेत.     कल्याण-डोंबिवली, ठाणो विभागातील युवा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. फडके मैदान येथे हा महोत्सव आयोजित केला आहे. तीन दिवसीय या महोत्सवात नृत्य, अभिनय, गायन, स्किट, माईम इ. कला प्रकार सादर होणार असून चित्रकला, फोटोग्राफी, रांगोळी, पोस्टर मेकिंग अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकार श्रीधर केळकर, रांगोळीकार उमेश पाचांळ, श्रीहरी पोवळे, अभाविप कोकण प्रदेशमंत्री अनिकेत ओव्हाळ यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.     श्रीधर केळकर म्हणाले, या कलाप्रदर्शनाच्या निमित्ताने सामान्य विद्यार्थ्यांना त्यांच्या कला प्रदर्शित व सादर करता येणार आहेत. त्यामुळे हे युवकांचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.    अनिकेत ओव्हाळ म्हणाले, कल्याणच्या इतिहासात प्रथमच अशा मोठय़ा आर्ट्स फेस्ट कार्यक्रमाचे आयोजन होत असून यातून युवकांना प्रेरणा मिळेल. तसेच कल्याण डोंबिवलीचा सांस्कृतिक वारसा जपण्यात या कार्यक्रमांची मदत होईल, असे सांगितले.     महोत्सवाच्या पहिल्या दिवशी फोटोग्राफी प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात कल्याण-डोंबिवलीतील 300 कलाकरांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वाईल्ड लाईफ, कोकणातील जीवनमान आणि स्थानिक भागातील विविध स्पर्धा, क्रीडा व सांस्कृतिक ओळख या प्रदर्शनातून करून देण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ मध्ये पक्षी व प्राण्यांची अंदाजे 100 छायाचित्रे लावण्यात आली आहेत. बुलढाणा सातारा या परिसरातील अभयराण्यातून ही छायाचित्रे काढण्यात आली आहेत.     रांगोळी स्पर्धेसाठी कोणताही विषय देण्यात आला नव्हता. हौशी 12 कलाकारांनी रांगोळी साकारली आहे. त्यामध्ये अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथील कलाकार सहभागी झाले होते. स्त्रीभूण हत्या यासारखे सामाजिक संदेश रांगोळीतून देण्यात आले. तर चित्रकला स्पर्धेत प्रदूषित पाणी, मुलगी वाचवा, जागतिक शांतता हा विषय घेतले आहेत. या स्पर्धेत 25 स्पर्धक सहभागी झाले आहेत. 

कला महोत्सवात 24 जानेवारीला नाटक, नृत्य,माईण्ड या स्पर्धा होणार आहेत. नृत्य व अभिनय या स्पर्धेच्या ऑडिशन्स पूर्ण झाल्या असून निवडले गेलेले स्पर्धक, मुख्य कार्यक्रमात आपली कला सादर करतील. 

टॅग्स :Studentविद्यार्थीkalyanकल्याण