डोंबिवलीत घुमला कबड्डीचा दम

By Admin | Updated: December 22, 2016 05:38 IST2016-12-22T05:38:39+5:302016-12-22T05:38:39+5:30

शहरातील शिवाई क्रीडा मंडळाने भरवलेल्या कल्याण तालुका आंतरशालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत एकूण

Dombivliat ki kabaddi ki dham | डोंबिवलीत घुमला कबड्डीचा दम

डोंबिवलीत घुमला कबड्डीचा दम

डोंबिवली : शहरातील शिवाई क्रीडा मंडळाने भरवलेल्या कल्याण तालुका आंतरशालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत एकूण पाच गटांमध्ये ८१ शाळांनी सहभाग घेतला.
शिवाई बालक मंदिर शाळेच्या पटांगणात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, सभागृह नेते राजेश मोरे, विनायक जोशी, शरद गंभीरराव, शालेय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत ठोसर आदी उपस्थित होते. १६ व १९ वर्षांखालील मुले व मुलींचे चार गट तसेच १४ वर्षांखालील मुलांचा एक गट अशा एकूण पाच गटांमध्ये ही स्पर्धा झाली. विजेत्यांना आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल साळुंखे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. विजेत्या मुलांच्या संघाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चषक, तर मुलींच्या संघाला सीमा ठोसर चषक देण्यात आला.
आदर्श विद्यालयाची बाजी
१४ वर्षांखालील मुलांच्या संघात निळजे येथील आदर्श विद्यालय विजयी, तर रतनबुवा पाटील उपविजयी ठरले. उत्कृ ष्ट चढाईसाठी शुभम कनोजिया (आदर्श विद्यालय), उत्कृष्ट पकड केतन पिसाळ (रतनबुवा पाटील), उत्कृष्ट खेळाडू आशीष शहाजी (आदर्श विद्यालय) यांनी पारितोषिके मिळवली.
वेणूताई पावशे विद्यालय विजयी
१६ वर्षांखालील मुलांच्या संघातून कल्याण येथील वेणूताई पावशे विद्यालय विजयी, तर कल्याण येतील मातोश्री गायकवाड शाळा उपविजयी ठरली. उत्कृष्ट चढाईसाठी शैलेश तर्डेकर (मातोश्री विद्यालय), उत्कृष्ट पकड म्हणून क्षितिज म्हात्रे (वेणूताई पावशे विद्यालय), उत्कृष्ट खेळाडू म्हणून मयूर घोलप (वेणूताई पावशे) यांना गौरवण्यात आले.
मुलींमध्ये स्वामी विवेकानंद अजिंक्य
मुलींच्या १६ वर्षांखालील गटातून स्वामी विवेकानंद, विष्णूनगर शाळा विजयी तर सर्वोदय विद्यालय, निळजे उपविजयी ठरली. उत्कृष्ट चढाईसाठी निकिता पाटील (सर्वोदय विद्यालय), उत्कृष्ट पकडीसाठी पूर्वा पाठारे (स्वामी विवेकानंद), तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून धनश्री बऱ्हाटे (स्वामी विवेकानंद विद्यालय) यांना गौरवण्यात आले.
१९ वर्षांखालील मुलांमधून मढवी महाविद्यालय (विजयी), तर संभाजीराव देशमुख शाळा उपविजयी ठरली. उत्कृष्ट चढाईसाठी राहुल दळवी (संभाजीराव देशमुख), उत्कृष्ट पकडीसाठी भूषण शिर्के (मढवी महाविद्यालय), तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून शुभम सावंत (मढवी कॉलेज) यांना सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Dombivliat ki kabaddi ki dham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.