शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

डोंबिवलीत राड्यांची ‘शोभायात्रा’, रिपब्लिकन पक्षात जिल्हाध्यक्ष हटवण्याचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 6:30 AM

केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे निष्क्रिय ठरले असून, त्यांना हटवावे, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रिपाइं युवक आघाडी आणि झोपडपट्टी महासंघाने सभा बोलावली होती.

डोंबिवली - केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे निष्क्रिय ठरले असून, त्यांना हटवावे, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रिपाइं युवक आघाडी आणि झोपडपट्टी महासंघाने सभा बोलावली होती. या वेळी तेथे पोहोचलेल्या जाधव यांनी सभेच्या आयोजकांना मारहाण केली. काही महिलांनाही मारहाण झाल्याने सभागृहातील महिलांनी जाधव यांना बेदम मारहाण केली.केडीएमसीच्या विभागीय कार्यालयात घेतलेल्या सभेला पक्षाचे वरिष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, युवक आघाडीचे संग्राम मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीना साळवे, जिल्हा सचिव व माजी नगरसेवक भीमराव डोळस आणि झोपडपट्टी महासंघाचे स्थानिक अध्यक्ष माणिक उघडे आदी उपस्थित होते. या सभेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जाधव यांना हटवावे, अशी मागणी करण्यात आली. जाधव यांच्या निष्क्रिय कारभारामुळे पक्षाची अधोगती झाली आहे. याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सांगण्यात आले आहे. आठवले यांनी महिनाभरात निर्णय न घेतल्यास नवीन कार्यकारीणी नेमून नवा जिल्हाध्यक्ष जाहीर केला जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.महापालिकेच्या अर्थसंकल्पात दलित वस्ती सुधारणा किंवा अन्य योजना अंतर्गत एकूण अर्थसंकल्पाच्या टक्केवारीनुसारही (१० टक्के) तरतूद केली जात नसल्याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले. डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येत्या १४ एप्रिलपूर्वी बसवावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच १६ मार्चला दिल्ली येथे होणाºया पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासंदर्भात सभेत मार्गदर्शन करण्यात आले.दरम्यान, सभा सुरू असताना अचानक जाधव तेथे पोहोचले. ‘तुम्हांला सभा घेण्याचा अधिकार कोणी दिला,’ असा त्यांनी आयोजकांना करत मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. व्यासपीठावरील डोळस आणि उघडे यांना जाधव यांनी मारहाण केली. या वेळी मध्यस्ती करणाºया महिलांनाही जाधव यांनी मारहाण केली. त्यामुळे महिलांनीही जाधव यांना बेदम मारहाण केली. या हाणामारीची माहिती मिळताच महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी सभागृहाच्या दिशेने धाव घेतली. रामनगर पोलिसांनाही बोलवण्यात आले.सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र वाडेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी घटनास्थळी धाव घेत हाणामारी करणाºयांना ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.कोणालाही मारहाण केलेली नाहीमी २० ते २५ वर्षे जिल्हाध्यक्ष आहे. सोशल मीडियावर काहीजण चुकीची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्याबाबत मी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.जेव्हा एखादा कार्यक्रम करताना शहरातील प्रमुख पदाधिकाºयांना माहिती देणे आवश्यक होते, परंतु त्यांनी कोणतीही विचारणा केली नाही. मी फक्त समजवण्यासाठी गेलो होतो. कोणालाही मारहाण केलेली नाही, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.विनयभंगाची तक्रार देणारमहिलांना मारहाण केल्याप्रकरणी जाधव यांच्याविरोधात आम्ही विनयभंगाची तक्रार करणार असल्याची माहिती महिला जिल्हाध्यक्ष मीना साळवे यांनी दिली.पक्षातील गटबाजी उघडया घटनेमुळे रिपाइंतील गटबाजी उघड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले या हाणामारीचा कसा समाचार घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :thaneठाणे