शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीचे नगरसेवक कुणाल पाटील सुपारी प्रकरण: ग्रामीणकडून शहर पोलिसांकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:33 IST

भाजपचे कल्याण डोंबिवलीतील सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येचा कट डोंबिवलीतच शिजल्याने हे प्रकरण आता ठाणे ग्रामीणकडून शहर पोलिसांच्या मानपाडा पोलिसांकडे वर्ग केले आहे.

ठळक मुद्देडोंबिवलीतच शिजला हत्येचा कटगणेशपुरीनंतर आता मानपाडा पोलिस करणार तपासदोन वेळा झाला हल्ल्याचा प्रयत्न

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचेच नगरसेवक महेश पाटील यांच्याविरुद्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या हत्येचा कट डोंबिवलीतच शिजला, तसेच त्यासाठी मारेकरी डोंबिवली परिसरात जमा झाले होते, असा तपशील आणि पुरावे हाती आल्याने ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशानुसार हे संपूर्ण प्रकरण कल्याण परिमंडळातील मानपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.भिवंडीत कुडूस येथे एका दरोड्याचा तपास ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांचे पथक करत होते. त्यांनी १३ डिसेंबरला भिवंडीतून कैलास घोडविंदे, राजू शेट्टी, अलुद्दीन शेख, विजय मेनबन्सी आणि सुजित नलावडे आदी सहा दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्यापैकीच विजयच्या माहितीवरून कुणाल यांच्या हत्येची सुपारी महेश पाटील यांनी दिल्याचे उघड झाले. त्यानंतर, पोलिसांनी यातील सर्व बाबींची खातरजमा केली. आरोपी तसेच सुपारी देणारे महेश पाटील यांचे टॉवर लोकेशन तपासण्यात आले. त्यानुसार, २९ आणि ३० नोव्हेंबर २०१७ या दोन्ही दिवशी या सहाही जणांचे ‘लोकेशन’ ठाकुर्ली गावाजवळ आढळले. त्यांच्यापैकी दाभाडे हाही नाशिक येथून तिथे आल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांचे लोकेशन कुणाल पाटील यांच्या घराजवळ मिळाले. त्याच वेळी ते त्यांची हत्या करणार होते. कुणाल यांनीही २०१५ मध्ये महेश यांना ठार मारण्याची सुपारी दिली होती, असा आरोप आहे. ५० लाखांच्या या सुपारीपैकी १० लाख रुपये त्यांनी घेतले. अ‍ॅडव्हान्स पैसे घेऊनही ते ‘कामगिरी’ पार पाडण्यात अयशस्वी ठरल्यामुळे पुन्हा १६ डिसेंबरला ते हल्ल्याच्या तयारीत होते. या सर्वच बाबींची पडताळणी झाल्यानंतर ठाणे ग्रामीणच्या गणेशपुरी पोलीस ठाण्यात २१ डिसेंबरला रात्री १० च्या सुमारास महेश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कुणाल यांच्या हत्येसाठी या सर्वांची पहिली बैठक महेश पाटील यांच्याच डोंबिवलीतील कार्यालयात झाली. दुसरी बैठक भिवंडी परिसरात झाली. ही दोन्ही ठिकाणे ठाणे शहर आयुक्तालयाच्या कल्याण परिमंडळातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण मानपाडा पोलिसांकडे वर्ग करण्याचे आदेश अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिले. हत्येचा कट करणे, हत्येचा प्रयत्न करणे आदी कलमांखाली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस