शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

रिक्षाचालकांकडून डोंबिवलीत लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:19 AM

शहरात बहुतांश रिक्षा सीएनजीवर धावत असतानाही पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ झाल्याने भाडेवाढ देण्याची मागणी आदर्श रिक्षा-चालक-मालक संघटनेने केली आहे.

डोंबिवली : शहरात बहुतांश रिक्षा सीएनजीवर धावत असतानाही पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ झाल्याने भाडेवाढ देण्याची मागणी आदर्श रिक्षा-चालक-मालक संघटनेने केली आहे. सरकारने ही वाढ मंजूर केली नसतानाही संघटनेने परस्पर शेअर रिक्षाच्या भाड्यात प्रतिसीट दोन रुपयांची वाढ करत प्रवाशांची लूटमार सुरू केली आहे. याप्रकरणी आदर्श संघटना आणि काळू कोमास्कर यांना नोटीस बजावल्याचे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) संजय ससाणे यांनी सांगितले.पूर्वेतील रामनगर परिसरातून आयरेगाव, लक्ष्मणरेखा, तुकारामनगर, सुनीलनगर, अशोकवाटिका, नांदिवली रोड, पराग बंगला, नांदिवली रोड-नाला व मठ, नांदिवली टेकडी, सर्वोदय पार्क, केबल आॅफिस, गावदेवी मंदिर, गजानन चौक, देसलेपाडा, गार्डियन स्कूल, लोढा चौक, नवनीतनगर, भोपर कमान, भोपर बसस्टॅण्ड, जी.आर. पाटील शाळा, रेल्वेफाटक आदी भागांत शेअर रिक्षा जातात. संघटनेने रामनगर परिसरात बॅनरबाजी करत या मार्गांवर बेकायदा दोन रुपयांची भाडेवाढ केली आहे. त्यामुळे या मार्गांवर आता किमान भाडे १० रुपये, तर कमाल भाडे २३ रुपये असणार आहे. इंधनदरवाढ कमी करा, अन्यथा भाडेवाढीला मंजुरी द्यावी. तसेच प्रवाशांनी रिक्षाचालकांना सहकार्य करावे, असे आवाहनही या बॅनरवर करण्यात आले आहे.दरम्यान, या पद्धतीने कोणीही बेकायदा भाडेवाढ करू शकत नाही. परस्पर बॅनर लावून भाडेवाढ केल्याचे जाहीर करणाऱ्या संघटनेवर आणि अशी भाडेवाढ घेणाºया रिक्षाचालकांवर कारवाई होणार आहे, असे ससाणे यांनी स्पष्ट केले. प्रवाशांनी जादा दोन रुपये प्रतिसीट न देता नेहमीचेच भाडे द्यावे, असेही ते म्हणाले. त्यानंतरही कोणी रिक्षाचालक जबरदस्ती करत असल्यास त्याची माहिती तातडीने आरटीओ, वाहतूक पोलीस आदींना द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.कारवाईकडे कानाडोळाडोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोड, कुंभारखाणपाडा मार्गावरही काही महिन्यांपासून शेअर रिक्षाचालक प्रतिसीटसाठी बेकायदा दोन रुपये वाढीव भाडे घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांना आठऐवजी १० रुपये मोजावे लागत आहेत.या मार्गावर रिक्षाचालकांना भाडेवाढ देण्यासंदर्भात आरटीओ, वाहतूक पोलिसांनी सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवालही त्यांनी वरिष्ठ पातळीवर दिला आहे. त्याला अजून मंजुरी मिळालेली नाही. मात्र, वाढीव भाडे घेणाºया रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाdombivaliडोंबिवली