शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

डोंबिवलीतील उड्डाणपुलाच्या डागडुजीसाठी लागणार आठ महिने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:13 AM

खर्च कोणी करायचा? : महापालिका, रेल्वेची पहिली बैठक निष्फळ, वाहतूककोंडीला सामोरे कसे जायचे हा खरा प्रश्न

डोंबिवली : शहरातील पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मेपासून वाहतुकीसाठी बंद करावा, असे पत्र मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला पाठवले आहे. त्यामुळे महापालिकेची पंचाईत झाली आहे. हा पूल वाहतुकीलाठी बंद केल्यास शहरात उद्भवणाऱ्या वाहतूककोंडीला कसे सामोरे जायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही पूल बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यास त्याच्या डागडुजीसाठी साधारणपणे आठ महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढा मोठा काळ वाहतूकबदलांसह सर्वच नियोजन काटेकोरपणे करावे लागणार आहे. परिणामी, वाहतूक नियंत्रण विभागासमोरही पेच आहे.मध्य रेल्वेच्या अभियंता विभागातील सहायक अभियंता आर.एन. मैत्री, विभागीय अभियंता दीपक पाटील आदींसमवेत महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकारी सपना कोळी, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांच्यामध्ये गुरुवारी बैठक झाली. त्यात या पुलाच्या डागडुजीचा खर्च कोणी उचलावा तसेच त्याचा अंदाजे खर्च किती असेल, यासंदर्भात चर्चा झाली. डागडुजी रेल्वे प्रशासन करणार असून निधीची तयारी महापालिकेने करावी, असेही सुचवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत रेल्वेच्या हद्दीतील पुलांची डागडुजी रेल्वेने केली आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी यावेळी रेल्वेला सांगितले. पण, तसे या पुलासंदर्भात करता येणार नाही, असे स्पष्टीकरण रेल्वेने दिले.हा पूल १९७८ मध्ये बांधण्यात आला आहे. तेव्हा महापालिका अस्तित्वात नव्हती. त्यामुळे नेमका करार काय झाला होता, त्याची प्रत महापालिकेला मिळावी, अशी मागणी कोळी यांनी केली आहे. साधारणपणे रेल्वे उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील काम रेल्वे प्रशासन करते. त्यास लागणारे जोडरस्ते आणि वरील रस्त्याचा भाग याची देखभाल, डागडुजी ही स्थानिक स्वराज्य संस्था करते, असा निकष असल्याने नेमका खर्च कोणी करायचा, हे करारपत्र बघून त्यानंतरच स्पष्ट केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, वाहतूक नियोजन करण्यासंदर्भात ठाणे येथील वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त अमित काळे यांना आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिट अहवालासह मध्य रेल्वेचे पत्र पाठवण्यात येणार आहे, असे महापालिकेतील सूत्रांनी यावेळी सांगितले.अनेक प्रश्न अनुत्तरीतच : मुळात उड्डाणपुलाच्या डागडुजीच्या कामाचा खर्च कोणी करायचा, हेच अद्याप ठरलेले नाही. त्यात जबाबदारी जरी निश्चित झाली, तरी त्या कामाचे टेंडर कधी निघणार? त्याला लागणारा अवधी आणि तोंडावर आलेला पावसाळा त्यात काम केले जाणार का? हे प्रश्न अनुत्तरीतच आहे.तसेच रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता डी.डी. लोलगे यांनी महापालिकेला पत्र दिले असून ते रजेवर असल्याने बैठकीला अनुपस्थित होते, असे सांगण्यात आले. त्यामुळे गुरुवारी झालेल्या दोन्ही यंत्रणांच्या बैठकीमधून विशेष काही निष्पन्न झाले नसल्याचे चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.