शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

डोंबिवलीत सायकल मित्र संमेलनासाठी २८ जानेवारीची तारीख मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 6:11 PM

राष्ट्रीय स्तरावरील सायकल मित्र संमेलन डोंबिवलीत भरवण्यासाठी क्रिडा भारती, डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ आॅर्गनायझेशन यांच्यासह विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

अनिकेत घमंडीडोंबिवली: राष्ट्रीय स्तरावरील सायकल मित्र संमेलन डोंबिवलीत भरवण्यासाठी क्रिडा भारती, डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ आॅर्गनायझेशन यांच्यासह विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी देशामधील विविध सायकलप्रेमी संस्थांना, सायकलपटूंना आमंत्रित करण्यात आले आहे, हे संमेलन २८ जानेवारी रोजीच घ्यावे असा संस्थांचा मानस आहे, पण त्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर उपलब्धच होत नसल्याने आयोजकांची घालमेल वाढली आहे. तारखांच्या घोळाचा फटका संस्थांना बसला असून दोन महिन्यांपासून सातत्याने खेपा घालूनही तारीख पे तारीख दिली जात असल्याने संमेलन आयोजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.या संमेलनाच्या आयोजकांपैकी एक प्रमुख डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या तारखाच मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. गेले दोन महिने प्रस्ताव अर्ज त्यांनी फुले रंगमंदिराच्या व्यवस्थापकांना दिला, पण तो पुढे गेलाच नसल्याचे वास्तव त्यांना गुरुवारी कळाले. त्यानूसार त्यांनी लोकमत जवळ संताप व्यक्त करत नाराजी दर्शवली. डॉ. पुणतांबेकर म्हणाले की, विविध संस्था एकत्र येत एक महत्वपूर्ण वाटचाल करत असतांना महापालिकेकडून सहकार्य मिळत नाही हे योग्य नाही. त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर नगरसेवक संदीप पुराणिक, ज्येष्ठ नगरसेवक, स्थायीचे सभापती राहुल दामले यांनी अतिरीक्त आयुक्त संजय घरत यांना संपर्क साधला, शुक्रवारी सकाळी नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांसमवेत घरत यांची चर्चा झाली. त्यानूसार २८ जानेवारी तारिख मिळण्याचे डॉ. पुणतांबेकर यांना आश्वासन मिळाले असून पुढील आठवड्यात त्यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता होणार आहे. त्यामुळे अद्यापही ठोसपणे निर्णय झालेला नसून आणखी चार दिवस वाट बघावी लागणार आहे.मुळात दोन महिने प्रस्ताव धुळखात का पडुन होता असा सवाल पुणतांबेकर यांनी केला. तो वरिष्ठांकडे पाठवला आहे, असे पोकळ आश्वासन आम्हाला का देण्यात आले असेही ते म्हणाले. पर्यावरणाच्या दृष्टीने जे सायकल मित्र संमलेन भरवण्याचा संस्थांचा मानस आहे तो निस्पृह असून त्यात महापालिकेने सहकार्य करणे अपेक्षित आहे, वरिष्ठ अधिकारी सहकार्याची भूमिका घेत असतांना कनिष्ठ अधिकारी तसे सहकार्य का करत नाहीत असा सवाल त्यांनी केला. त्यात उद्देश काय? चांगले कार्य शहरात होत असतांना त्याला आडकाठी कशी मिळते याचे उदाहरण म्हणजे आमची दोन महिने झाली फाइल धुळखात पडुन ठेवली हे असल्याचेही ते म्हणाले.कोणतीही स्पष्ट, पारदर्शी आणि सुटसुटीत भूमिका का घेतली जात नाही. प्रत्येक ठिकाणी अडथळे का यावेत हे योग्य नसल्याचे ते म्हणाले. देशव्यापी संमेलन भरवतांना डोंबिवलीकरांमध्ये जशीआनंदाची भावना आहे, तशी ती महापालिकेची जबाबदारी नाही का? असेही ते म्हणाले. एकीकडे स्मार्ट सिटी करण्याचा आयुक्त पी.वेलरासू यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी आमच्यासमवेत दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या दालनात तीन तास बैठक घेतली. पर्यावरणाला सहकार्य करणा-या डीसीसी संस्थेचे योगदान मोलाचे असल्याचे ते म्हणाले होते. स्मार्ट सिटीत सायकल ट्रॅक देण्याची त्यांची सकारात्मक मानसिकता आहे. असे असतांना महापालिकेचे खालचे अधिकारी अशी आडमुठ्ठी भूमिका घेत असतील तर ते महापालिकेच्या महत्वाकांक्षी योजनांना मारक असल्याचेही ते म्हणाले.मंगळवारर्पंत २८जानेवारी अथवा ४ फेब्रुवारी यापैकी एखादी तारिख संमेलनासाठी न मिळाल्यास झालेल्या त्रासाबाबत पीएमओ कार्यालय दिल्ली आणि मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार करणार, तेथे नाराजी व्यक्त करणार असल्याचा पवित्राही त्यांनी व्यक्त केला. नाट्यगृह फुकट तर मागत नाही, त्यासाठी जे रितसर पैसे भरायचे ते देखिल आम्ही भरायला तयार आहोत. संमेलन तर होणारच अशीही भूमिका त्यांनी स्पष्ट केली.सायकल मित्र संमेलनासाठी माझे सहकार्य निश्चितच मिळणार, त्यासंदर्भात शुक्रवारीच अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी माझे व नगरसेवक पुराणिक, दामले, यांचे बोलणे झाले आहे. नगरसेवक राजन आभाळे यांचाही फोन आला होता. लवकरच आयोजकांच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार होणार आहे - दत्तात्रय लधवा, व्यवस्थापक, सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका