डोंबिवली बँकेची सुवर्णमहोत्सवी वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:15 IST2021-02-21T05:15:48+5:302021-02-21T05:15:48+5:30

डोंबिवली : डोंबिवली नागरी सहकारी बँकेची सुवर्णमहोत्सवी वार्षिक सभा अलीकडेच सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे झाली. या आर्थिक वर्षात सभासदांच्या ...

Dombivli Bank's Golden Jubilee Annual Meeting | डोंबिवली बँकेची सुवर्णमहोत्सवी वार्षिक सभा

डोंबिवली बँकेची सुवर्णमहोत्सवी वार्षिक सभा

डोंबिवली : डोंबिवली नागरी सहकारी बँकेची सुवर्णमहोत्सवी वार्षिक सभा अलीकडेच सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे झाली. या आर्थिक वर्षात सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत वार्षिक सभा घेण्यात आली.

अध्यक्ष उदय कर्वे यांनी बँकेच्या कामगिरीबाबत तपशीलवार विवेचन केले. बँकेचा नफा वृद्धिंगत झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्ष व अन्य सर्व संचालकांनी सभेतील सर्व ठरावांच्या विषयांसंबंधात क्रमाक्रमाने माहिती दिली व विविध ठराव सभेपुढे मांडले. सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

बँकेचे सरव्यवस्थापक गोपाळ परांजपे यांनी चालू वर्षातही बँकेची नफाक्षमता उत्तम असल्याचे गेल्या दहा महिन्यांतील कामगिरीवरून जाणवत असल्याबाबत तपशीलवार विवेचन केले. कोरोना काळात बँकेने राबविलेल्या खर्च बचतीच्या अनेक योजनांना आलेले भरीव यश, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने बँकेने केलेली मदत, तसेच बँकेच्या विविध उपक्रमांबद्दल सभासदांनी मनापासून समाधान व्यक्त केले. बँकेचे संचालक व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठरावही बैठकीत पारित करण्यात आला.

-----------

Web Title: Dombivli Bank's Golden Jubilee Annual Meeting