Dombivali: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमुळे उत्साहात

By अनिकेत घमंडी | Published: September 6, 2023 05:28 PM2023-09-06T17:28:51+5:302023-09-06T17:29:10+5:30

Janmastami in School: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. छोटा शिशु ,मोठा शिशु आणि बालक वर्ग या तीनही विभागातील विद्यार्थ्यांचा यात उत्साही सहभाग होता. या उत्त्सवात पालकही सहभागी झाले.

Dombivali: Dahihandi of Tilaknagar Balak Mandir in excitement by teachers, students and parents | Dombivali: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमुळे उत्साहात

Dombivali: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमुळे उत्साहात

googlenewsNext

- अनिकेत घमंडी

डोंबिवली - टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. छोटा शिशु ,मोठा शिशु आणि बालक वर्ग या तीनही विभागातील विद्यार्थ्यांचा यात उत्साही सहभाग होता. या उत्त्सवात पालकही सहभागी झाले. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष मा. श्री. कामतेकर सर यांनीही या उत्त्सवाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी सुंदर असे राधा आणि कृष्ण यांचे वेष परिधान केले होते. हंडी फोडून मुलांना प्रसाद देण्यात आला. अतिशय उत्साही वातावरणात हा सण साजरा करण्यात आला.

येथील श्री गणेश मंदिरात देखील कृष्णजन्मानिमित्त सुमारे २०० लहान मुले, मुली राधाकृष्ण वेशात आली होती, त्यांची मिरवणूक देखील यानिमित्ताने काढण्यात आली.

Web Title: Dombivali: Dahihandi of Tilaknagar Balak Mandir in excitement by teachers, students and parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.