शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नदीतून प्रवास... जव्हारमधील वृद्ध महिला रुग्णाला डोलीचा आसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 10:26 IST

नदीतून प्रवास करत दवाखान्यात भरती करण्याची आली वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासींना आजही पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील एका वृद्ध महिलेला रुग्णालयात नेताना रस्त्याअभावी लाकडी डोलीचा आधार घेऊन नदी पार करीत रुग्णालयात भरती करण्याची वेळ शुक्रवारी आली. ही बाब नवीन नसून जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील काही अतिदुर्गम गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.

भाटीपाडा गावात राहणाऱ्या लक्ष्मी लक्ष्मण घाटाल (वय ६२) या वृद्ध महिलेच्या पायाला मोठी जखम झाल्याने त्यांचा पाय सुजला होता. वेदना असह्य झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात न्यायचा निर्णय घेतला. मात्र, तिथे नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

३ किलोमीटर अंतर केले चालत पार n रस्ता नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी डोली बनविली व काळशेती नदीच्या पात्रातून जवळपास १०० मीटर अंतर पार करून मुख्य रस्ता येईपर्यंत ३ किलोमीटर अंतर चालत डोंगरदऱ्या व जंगलातून वाट काढीत रुग्ण महिलेस जव्हार रुग्णालयात दाखल केले. n ही बाब बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांना समजताच त्यांनी रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी तातडीने मदत उपलब्ध करून दिली. 

निधी उपलब्ध झाल्यास होऊ शकेल रस्ता या गावात रस्ता व्हावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून दरोडा हे पाठपुरावा करत आहेत, परंतु अजूनही रस्ता बनविण्यासाठी निधी मिळाला नाही. ही जागा वन विभागात असल्याचे कारण देण्यात येत होते, परंतु आता वनविभागाच्या ३ (२) चा प्रस्ताव मंजूर झाला असून, निधी उपलब्ध झाल्यास हा रस्ता होऊ शकेल, असे दरोडा यांनी सांगितले. यावेळी झाप ग्रामपंचायत माजी उपसरपंच तुकाराम गरेल, चंद्रकांत वाढू, जगन खानझोडे, लक्ष्मण खानझोडे, विलास बागुल व भाटीपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारthaneठाणेriverनदी