मारहाणीत कुत्र्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:41 IST2021-09-19T04:41:13+5:302021-09-19T04:41:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्राः येथील संजयनगर परिसरातील शिवाजी चौकात एका भटक्या कुत्र्याला स्टम्पने केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना ...

The dog died in the beating | मारहाणीत कुत्र्याचा मृत्यू

मारहाणीत कुत्र्याचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंब्राः येथील संजयनगर परिसरातील शिवाजी चौकात एका भटक्या कुत्र्याला स्टम्पने केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मारहाण केलेल्या फिरोज शेख यांच्याविरोधात भारतीय दंड सहिता ४२९ तसेच प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११(१)(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मृत कुत्रा परिसरात शौच करून घाण करतो या कारणावरून शेख याने शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याला मारहाण केली होती. यामुळे त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता, तसेच त्याला अंतर्गत मारदेखील लागला होता. यामुळे रस्त्यावर विव्हळत असलेल्या त्या कुत्र्याला काही स्थानिक नागरिकांनी ॲनिमल वेल्फेअर सोसायटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन माटुंगा येथे करण्यात आले, सोमवारी त्याचा अहवाल येणार असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. त्याच्या मृत्युमुळे हळहळलेल्या काही स्थानिकांनी त्याच्या मृतदेहावर हार अर्पण करून बायपास रस्त्याजवळ मृतदेह दफन केला. काळूराम पवार या जागरुक नागरिकाने याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरून मारहाण केलेल्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The dog died in the beating