डॉक्टरांचे निषेध आंदोलन
By Admin | Updated: March 22, 2017 01:32 IST2017-03-22T01:32:08+5:302017-03-22T01:32:08+5:30
धुळे येथील जिल्हा शासकिय रूग्णालयासह नाशिक आणि मुंबईच्या सायन रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाणाच्या निषेधार्थ सर्वत्र आंदोलन

डॉक्टरांचे निषेध आंदोलन
ठाणे : धुळे येथील जिल्हा शासकिय रूग्णालयासह नाशिक आणि मुंबईच्या सायन रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाणाच्या निषेधार्थ सर्वत्र आंदोलन सुरु असतानाच, सोमवारी रात्री कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शिकाऊ महिला डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे येथील शिकाऊ डॉक्टरांनीही हाताला काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला.
कळवा शिवाजी रु ग्णालयात सोमवारी रात्री ११ वा. च्या सुमारास एका रु ग्णांच्या नातेवाईकांने तेथील शिकाऊ महिला डॉक्टरशी शाब्दिक बाचाबाची करून वाद घातला.
धुळ्यातील घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यातच पुन्हा अशी घटना घडल्याने बाचाबाचीच्या निषेधार्थ सोमवार रात्री बारा वाजल्यापासून या डॉक्टरांनी हाताला काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात सुरुवात केली. डॉक्टरांचे हे आंदोलन मंगळवारीही सुरु होते. (प्रतिनिधी)