शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोविड रुग्णालयात डॉक्टर, औषधांची भासतेय कमतरता­, रुग्णांची हेळसांड होत असल्याचा भाजपचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 11:45 IST

या ठिकाणी उपचार घेत असलेल्या सरोज बारोट यांनी सांगितले की, येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय लक्ष देत नाहीत.

नालासोपारा : वसई-विरार महापालिका कोविड रुग्णालयात कोरोना रुग्णांना उत्तम सुविधा देत असल्याचा दावा मनपा करीत आहे. मात्र कोविड रुग्णालयात डॉक्टरांसह औषधांची कमतरता भासू लागली आहे. इथे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. महापालिकेचा आरोग्य विभाग रुग्णांच्या आरोग्यासोबत खेळत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

वसईच्या पूर्वेकडील वरुण इंडस्ट्रीजमध्ये बनलेल्या १२०० बेडच्या कोविड रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असून रुग्णांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा आरोप भाजपचे उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी केला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास स्वतः या कोविड रुग्णालयात रुग्णांची विचारपूस आणि सोयी-सुविधा मिळतात की नाही हे पाहण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी फक्त दोनच डॉक्टर कोविड रुग्णालयात उपस्थित होते. त्यांनी रुग्णांकडे विचारपूस केली असता, मागील १५ दिवसांपासून या रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी फक्त दोनच डॉक्टर येत असून देखभालीसाठी ८ ते १० परिचारिका उपस्थित असतात. ६०० ते ७०० कोरोना रुग्णांचे आरोग्य त्यांच्याच भरवशावर अवलंबून आहे. 

या ठिकाणी उपचार घेत असलेल्या सरोज बारोट यांनी सांगितले की, येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय लक्ष देत नाहीत. रुग्णांना स्वतःचे काम स्वतः करावे लागते. यामुळे घरीच उपचार घेतले असते तर बरे झाले असते. या ठिकाणी जनावरांसारखे कोरोना रुग्णांचे हाल होत असल्याचे उपचार घेत असलेले अशोक सुराणा यांनी सांगितले. 

पाच डाॅक्टर कार्यरतवसईच्या पूर्वेकडील वरुण इंडस्ट्रीजमध्ये सुरू असलेल्या या कोविड रुग्णालयात कार्यरत  असलेले डॉक्टर विनय सालपुरे यांच्याशी या सर्व महितीबाबत संपर्क साधला असता त्यांनी या रुग्णालयात पाच डॉक्टर आणि २० परिचारिका काम करत असल्याचे सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस