भिवंडी : भिवंडी -कल्याणमार्गावरील गोवेनाका येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये नोकरी करणाऱ्या डॉक्टरास शासनाच्या कामगार रूग्णालयात लावण्याचे आमिश दाखवून १ लाख ३१ हजार रूपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.प्रकाश बाळू कपारे असे फसवणूक करणा-या व्यक्तीचे नांव असुन त्याने गोवानाका येथील प्राणायू मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये काम करणा-या डॉ.महेश रावजी शेळके यांच्याशी ओळख वाढवून विश्वास संपादन केला. तसेच त्यांना मुलूंडमधील कामगार हॉस्पिटलमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्याच्या भुलथापांवर त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारे भाग्यश्री चव्हाण व मुझीद शेख अशा तिघांनी विश्वास ठेवला. याचा फायदा घेत प्रकाश कपारे याने सांगीतल्या प्रमाणे डोंबीवली येथील वैश्य बँकेत वेळोवेळी ठराविक रक्कम जमा केली. त्यांनी १ लाख ३१ हजार रूपये जमा केल्यानंतर देखील कामगार हॉस्पिटलमध्ये नोकरी लागण्याची चिन्हे दिसेना.त्यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. या प्रकरणी डॉ.महेश शेळके यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात प्रकाश बाळू कपारे याच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलीसांनी प्रकाश कपारे यास अटक केली आहे.
सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी लावण्याचे अमिश दाखवून डॉक्टरांना लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:06 IST
भिवंडी : भिवंडी -कल्याणमार्गावरील गोवेनाका येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये नोकरी करणाऱ्या डॉक्टरास शासनाच्या कामगार रूग्णालयात लावण्याचे आमिश दाखवून १ ...
सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी लावण्याचे अमिश दाखवून डॉक्टरांना लुबाडले
ठळक मुद्दे खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरास कामगार हॉस्पिटलचे आमिशसरकारी हॉस्पिटलच्या नोकरीसाठी तीनजण तयार१ लाख ३१ हजार रूपयांचा घातला गंडा