शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Andhare: माझी भरचौकात हत्या करायचीय का?, सुषमा अंधारेंचं भाजपला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 11:17 IST

माझी एक स्टाईल आहे, इलाका तुम्हारा, धमाका हमारा. धाराशिवमध्ये मला पत्रकारांनीच चर्चेतून प्रश्न विचारला

मुंबई -  भाजप आणि शिंदे गटाकडून महाप्रबोधन यात्रेवर सातत्याने टीका केली जाते, यासंदर्भात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अंधारे यांनी भाजपला एकप्रकारे आव्हानच दिलंय. तसेच, माझी भरचौकात हत्या करायची आहे का, असा सवालही विचारला. महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्व मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेपूर्वी अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला लक्ष्य केलं. गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे, असे म्हणत भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. 

माझी एक स्टाईल आहे, इलाका तुम्हारा, धमाका हमारा. धाराशिवमध्ये मला पत्रकारांनीच चर्चेतून प्रश्न विचारला. राऊतांनंतर आता सुषमा अंधारेंचा नंबर आहे, अशी चर्चा आहे. त्यावर, कशासाठी नंबर असेल माझा, माझ्यासाठी ईडी लावता येत नसेल तर मग माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या जाणार आहेत का, काय केलं जाणारंय, माझा तुम्ही अपघात घडवून आणणार आहात का?. तुम्हाला जे करायचंय ते करा. माझी तुम्ही भरचौकात हत्या करणार आहात का?, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपला लक्ष्य केलं. सुषमा अंधारे यांची आज रत्नागिरी येथे सभा होत आहे, तत्पूर्वी गुरुवारी रात्री त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच, जे करायचंय ते करा, असा इशाराही दिला. 

कणकवलीमध्ये श्रीधर नाईकांची भरचौकात हत्या झाली होती, तशी माझी हत्या करणार आहात का?. चला जे करायचंय ते करा. माझा आवाज बंद करण्यासाठी तुम्हाला जे करायचंय ते करा. पण, आम्ही ही महाप्रबोधन यात्रा पूर्ण करणारच, आमचा विचार मांडणारच, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. भय,भ्रम, चरित्र, हत्या ही सगळी अस्त्र तुम्ही वापरली आहेत, असे म्हणत अंधारे यांनी भाजपवर जोरदार टिका केली. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस