शहरं
Join us  
Trending Stories
1
जागोजागी कमांडो, ५०० CCTV...; नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत चोख सुरक्षा
2
Video : एका खेळाडूवर अवलंबून नाही! IND vs PAK लढतीपूर्वी विराटच्या प्रश्नावर Rohit Sharmaचं उत्तर
3
पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 
4
"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?
5
निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ
6
३ धावांवर ३ विकेट्स! Quinton de Kock 'डायमंड डक' ठरला, आफ्रिकेचा डाव गडगडला, Video 
7
रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र
8
"NDA सरकार पडणार", PM मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत
9
रोहित शर्माला पुन्हा दुखापत, संजना गणेसनची पोस्ट अन् जसप्रीत बुमराह नेतृत्व करण्याची चर्चा
10
Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर
11
दक्षिण आफ्रिकेने फास आवळला, नेदरलँड्सचा संघ कसाबसा शतकपार पोहोचला
12
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार
13
राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार 
14
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
15
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
16
रोहित, विराट यांना मित्रच समज...! शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांना प्रेमळ सल्ला, Video 
17
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
18
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
19
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
20
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा

‘फोनी’च्या भीतीमुळे रात्रभर झोप नाही, ओडिशा, प. बंगालमधील तरुणांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 4:06 AM

ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये थैमान घालणाऱ्या फोनी चक्रीवादळाने सर्व होत्याचे नव्हते झाले. गावाकडची उद्ध्वस्त झालेली घरेच सतत डोळ्यांसमोर दिसत असल्याने रात्रभर डोळा लागलेला नाही.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये थैमान घालणाऱ्या फोनी चक्रीवादळाने सर्व होत्याचे नव्हते झाले. गावाकडची उद्ध्वस्त झालेली घरेच सतत डोळ्यांसमोर दिसत असल्याने रात्रभर डोळा लागलेला नाही. आता केवळ कुटुंबीयांची काळजी करणे एवढेच आमच्या हाती आहे. इथे मन रमत नसले तरी करणार काय? येथे मिळणारी रोजीरोटीच गावाकडच्या कुटुंबाची आशा आहे. आम्हाला पुन्हा सर्व नव्याने उभे करावे लागेल. या अस्मानी संकटाला सामोरे जाण्याची ताकद आम्हाला द्यावी, हीच ईश्वराकडे मागणी आहे, असे ओडिशामधील देवकुमार मेतेई याने पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी सांगितले.पश्चिम मेदनापूरच्या दानतन गावातून कामानिमित्त डोंबिवलीत आलेल्या देवकुमारच्या चेहºयावर गावाकडची ओढ सतत दिसत होती. तो सतत फोनवरून कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. तुम्ही सर्व सुखरूप आहात ना. इतर कशाचीही काळजी करू नका. पुन्हा नव्याने सर्व उभे करू, असा सतत घरच्यांना फोनवरून धीर देत आहे.कल्याण-डोंबिवलीतील विविध हॉटेलमध्ये ओडिशा, पश्चिम बंगालमधून आलेले माझ्यासारखे शेकडो तरुण काम करत असल्याचे त्याने सांगितले. वेटर म्हणून आम्हाला महिन्याला १२ ते १५ हजार रुपये पगार मिळतो. या पैशांवरच आमचे कुटुंब चालते. देवकुमारप्रमाणेच शिवशंकर मेतेई, मनोज डे, सपन मेतेई, सुदीप डे, हेमाद्रीकर, हेमंत दास, जयंता दास, आशुतोष जे., गीताई सुसुमार यांचीही व्यथा आहे. हे सर्व पश्चिम बंगाल, ओडिशाच्या सीमावर्ती भागातील तरुण आहेत. त्यांच्यापैकी काहींनी ‘लोकमत’कडे आपल्या मनातील दु:खाला वाट करून दिली. घर, शेती सर्व उद्ध्वस्त झाले असले, तरी आमची जीवाभावाची माणसे सुखरूप आहेत, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. वादळात उद्ध्वस्त झालेली घरे, गावे पुन्हा उभी करू, असा विश्वासही त्यांच्या डोळ्यांत यावेळी दिसला.चक्रीवादळाने सर्वस्व हिरावले!आधीच गरिबी असताना चक्रीवादळाने आमचे सर्वस्वच हिरावून घेतले. घरच्यांच्या चिंतेने आम्ही रात्र जागून काढली. त्यांनी कालपासून काही खाल्ले आहे की नाही, ते सुखरूप तर आहेत ना, अशी काळजी सतत मन कुरतडत आहे. पगार मिळताच तो गावी पाठवण्याची व्यवस्था करायची आहे, असे देवकुमारने सांगितले.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळOdishaओदिशाwest bengalपश्चिम बंगाल