आरक्षणावर अवलंबून राहू नका - छत्रपती संभाजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:25 IST2018-02-19T00:25:50+5:302018-02-19T00:25:50+5:30
आरक्षण हा आपला हक्क आहे. त्यासाठी संघर्ष सुरू ठेवला पाहिजे. परंतु मराठा समाजाने आरक्षणावरच अवलंबून न राहता स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे मत खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केले.

आरक्षणावर अवलंबून राहू नका - छत्रपती संभाजी महाराज
बदलापूर : आरक्षण हा आपला हक्क आहे. त्यासाठी संघर्ष सुरू ठेवला पाहिजे. परंतु मराठा समाजाने आरक्षणावरच अवलंबून न राहता स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे मत खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केले. बदलापूरमध्ये सुरू असलेल्या मराठा महोत्सवाला खासदारांनी शुक्र वारी रात्री उशिरा भेट दिली. आमदार डॉ. बालाजी किणीकर व आमदार प्रताप सरनाईक त्यांच्यासोबत होते.
ते म्हणाले की, आपले अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. अनेक प्रश्न मार्गी लागतील. आपण थोडी वाट पाहू. एकजुटीने राहिले पाहिजे.समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर लोक जसे व्यवसाय करतात तसे आपणही करू शकतो,हा संदेश या महोत्सवाच्या माध्यमातून मराठा समाजापर्यंत गेला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संतोष रायजाधव, आशिष गायकवाड, कालिदास देशमुख, अरु ण चव्हाण, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, प्रज्योत साळुंखे, हेमंत यशवंतराव आदींनी छत्रपती संभाजी राजे भोसले, आमदार किणीकर व सरनाईक यांचा सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी स्वत:ची जागा देणाºया बदलापूर गावातील चव्हाण कुटुंबियांचा छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होेते.