पैसे न दिल्याने बायकोला मारहाण

By Admin | Updated: May 24, 2017 00:58 IST2017-05-24T00:58:27+5:302017-05-24T00:58:27+5:30

डोंबिवली पूर्वेकडील कचोरे रोडवरील गोविंदवाडी परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेकडे तिचा पती आणि सासऱ्याने रिक्षा घेण्यासाठी पैसे मागितले

Do not give money to beat her | पैसे न दिल्याने बायकोला मारहाण

पैसे न दिल्याने बायकोला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील कचोरे रोडवरील गोविंदवाडी परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेकडे तिचा पती आणि सासऱ्याने रिक्षा घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र, तिने नकार देताच या दोघांनी तिला आपल्या मित्रासह मारहाण केली. एवढेच नव्हे तर पतीने तिच्यावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना देखील घडली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी तिचा पती अफजल सय्यद, सासरे अबरार सय्यद आणि नवऱ्याचा मित्र सलमान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला डोंबिवली पूर्वेकडील कचोरे रोड येथील न्यू गोविंदवाडी येथे भावाच्या घरी राहते. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास तिचा पती, सासरे आणि नवऱ्याचा मित्र हे तिघे त्यांच्या घरात आले. त्यांनी या मिहलेकडे रिक्षा घेण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, तिने पैसे न दिल्याचा राग त्यांच्या डोक्यात होता. त्यातूनच ही मारहाण झाली.

Web Title: Do not give money to beat her