शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मीरा-भाईंदर महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी; सातवा वेतन आयोग लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:33 IST

राज्य सरकारची मंजुरी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ 

मीरा राेड : मीरा-भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतल्या एक हजार ५८६ आणि सेवानिवृत्त ४१० कर्मचाऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली आहे. आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी १ जानेवारी २०१६ पासून तर प्रत्यक्ष सुधारित वेतन १ ऑक्टोबर २०१९ पासून मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांची आतापासूनच दिवाळी सुरू झाली आहे. 

सातवा वेतन आयोग आल्यापासून पालिका कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी सतत मागणी चालवली होती. त्या अनुषंगाने फेब्रुवारी २०२० मधील महासभेत पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव केला होता. मार्चमध्ये तत्कालीन आयुक्तांनी नगरविकास विभागाकडे आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिला होता. मीरा-भाईंदर महापालिका कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष व सरचिटणीस श्याम म्हाप्रळकर आदींनी आयोग लागू व्हावा, यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले होते. सरनाईक यांनी नगरविकासमंत्री आणि विभागाकडे मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू होता. सरकारने पालिका कर्मचाऱ्यांना आयोग लागू करण्यास मंजुरी दिली असून तसा निर्णय अवर सचिव नवनाथ वाठ यांनी पालिका आयुक्तांना गुरुवारी पाठवला आहे. याचा लाभ पालिकेच्या एक हजार ५८६ कायम व ४१० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना  मिळणार आहे.  सध्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पाच कोटी १६ लाख १४ हजार ६४ रुपये इतका दरमहिन्याला खर्च येतो. आयोग लागू केल्यावर तोच खर्च सहा कोटी ७४ लाख नऊ हजार ६३३ रुपये इतका होणार आहे. या निणयाने कमर्चाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे दिसून आले.

अशी होणार पगारवाढआयोगाप्रमाणे वेतन मिळणार असल्याने सफाई कामगार, शिपाई आदींच्या पगारात दरमहा सुमारे सात हजार, तर लिपिक श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे नऊ  हजार इतकी वाढ होईल. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ अभियंता आदींच्या वेतनात सुमारे १२ ते १४ हजार, तर वर्ग १ च्या अधिकाऱ्यांच्या पगारात सुमारे १५ ते १६ हजार वाढ होईल, अशी पालिकेच्या आस्थापना विभागातील सूत्रांनी माहिती दिली. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक