जिल्ह्याच्या जलवाहतुकीचा भार ठामपाच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:08 AM2018-10-17T00:08:51+5:302018-10-17T00:09:01+5:30

शासनाचा निर्णय : साडेतेरा कोटींचा सल्लागार खर्च

district's water supply On the shoulders of the thane corporation | जिल्ह्याच्या जलवाहतुकीचा भार ठामपाच्या खांद्यावर

जिल्ह्याच्या जलवाहतुकीचा भार ठामपाच्या खांद्यावर

Next

ठाणे : जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्याचा भार आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुरू होणाऱ्या जलवाहतुकीचा भार पेलणे कठीण असल्याचा कबुली जबाब ठाणे महापालिकेने दिला होता. परंतु, जे काम मेरीटाईम बोर्डाकडून होणे अपेक्षित होते, ते काम शासनाच्या आदेशानुसार करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे.


त्यानुसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुरू होणाºया जलवाहतुकीचा भारही ठाणे महापालिकेने आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे - मुंबई आणि ठाणे - नवी मुंबई या दुसºया आणि तिसºया टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम आणि या कामासाठी सल्लगार नेमण्याचे काम पालिकेने हाती घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी १३.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.


पहिल्या टप्प्यात वसई - ठाणे - कल्याण हा ५४ किमी लांबीचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित केला आहे. यासाठी येणारा ६५० कोटींचा खर्च हा केंद्राकडून उपलब्ध होणार आहे; परंतु यासाठी सल्लागार नेमण्याच्या कामासाठी ४.५० कोटींचा खर्च पालिकेने केला आहे. त्यानंतर टप्पा दोन आणि तीनसाठी ठाणे महापालिकेकडे निधी नसल्याची कबुली प्रशासनाने दिली होती. तसेच जलवाहतुकीचा विषय हा मेरीटाईम बोर्डाशी निगडित असल्याने त्यांच्याकडून हे काम होणे अपेक्षित होते; परंतु आता त्यांचे कामही निधी नसतांना शासनाच्या आदेशामुळे ठाणे महापालिकेने आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱया टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू
दुसऱया टप्प्यातील ठाणे-मुंबई व ठाणे-नवी मुंबई या दोन्ही जलवाहतूक मार्गांसाठी सल्लागारांकडून अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. हे काम तातडीने व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे.
त्यानुसार २०१८-१९ मध्ये १० कोटी आणि २०१९-२० मध्ये ५.९३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. आता हा खर्च पालिका करणार असून, नंतर हा खर्च जलमार्ग प्राधिकरणाकडून (दिल्ली) यांच्याकडून मिळविण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे; परंतु तो महापालिकेने का करावा, असा सवाल आता केला जात आहे.

Web Title: district's water supply On the shoulders of the thane corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.