शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

शहापूर तालुक्यात महिलांची पाण्यासाठी वणवण थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 2:26 AM

दहिगाव ग्रा.पं.तील गावपाड्यांत टंचाई

- मनीष दोंदे खर्डी : उन्हाची काहिली वाढत चालली असतानाच खर्डी विभागातील दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील पळशीण, बोरीचापाडा, वझर, वडाचापाडा, बोराळा, शिशिवली आदी गावपाड्यांना सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.दहिगाव ग्रुपग्रामपंचायतीत जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्या असून या ग्रामपंचायतीचा विस्तार हा पाच गावे, त्याचे पाडे, जंगलपट्टी एवढा आहे. दहिगाव आणि पळशीण या दोन गावांसाठी ग्रा.पं.ने दहिगावजवळील तलावातून नळपाणीपुरवठा योजना बांधली आहे. मात्र, तलावातील पाणीसाठा फेब्रुवारी-मार्चपर्यंत असतो. त्यानंतर, तलावातील पाणी आटत जाते. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या ग्रामपंचायतीमध्ये सात विहिरी आहेत. त्यापैकी दहिगावच्या विहिरीला पाणी आहे. तर, उर्वरित सहा विहिरींमधील पाणी मार्च महिन्यापर्यंत पुरते. नंतर, त्याही कोरड्याठाक होऊन जातात.एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठापळशीण, वझर, बोरीचापाडा, वडाचापाडा येथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. बोरीचापाडा येथील महिलांना दीड ते दोन किलोमीटरहून पाणी डोक्यावरून वाहून आणावे लागते. ग्रामपंचायतीने यंदा शासनाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली. सध्या एक दिवसाआड तीन टँकरद्वारे पाणी विहिरीमध्ये टाकले जाते, मात्र तरीही हे पाणी पुरत नसल्याने महिलावर्ग त्रस्त झाला आहे. टँकरच्या फेऱ्या वाढवून दररोज पाणीपुरवठा केला जावा, असे स्थानिक महिलांनी ‘लोकमत’ला सांगितले. जंगलातील वस्तीला गाडीरस्ता नसल्याने टँकर वस्तीपर्यंत पोहोचत नाही. ग्रामपंचायतीने छोटा टँकर नेण्याचा प्रयत्न केला होता, पण रस्ता नसल्याने पुन्हा टँकर पाठवणे शक्य नाही. पळशीण येथे एक खाजगी बोअरवेल असून येथील महिला या बोअरवेलचे पाणी विकत घेत असत. मात्र, २० दिवसांपासून त्याचेही पाणी कमी झाल्याने पाण्याची वणवण थांबता थांबत नाही. यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत.शासनाने टँकर दररोज पाठवण्याची व्यवस्था करावी. एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने ते पुरत नाही. महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.- वैशाली घरत, सदस्य, ग्रामपंचायत, दहिगावआम्ही शासनाकडे जादा टँकरची मागणी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फतही खाजगी टँकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.- दीपक सापळे, उपसरपंच, ग्रामपंचायत, दहिगावआवश्यकतेनुसार टँकरचा पाणीपुरवठा वाढवला जाईल.- एम.जी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, शहापूर पंचायत समिती

टॅग्स :water shortageपाणीटंचाई