शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये शिवसेना नगरसेवकाकडून दारूच्या बाटल्यांचं वाटप; म्हणाला, करायला गेलो एक, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 13:59 IST

देशात कोरोनामुळे विदारक परिस्थिती उद्भवली असून लॉकडाऊन असल्याने लोकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे, अनेक सामाजिक संघटना, विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोनामुळे विदारक परिस्थिती उद्भवली असून लॉकडाऊन असल्याने लोकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे, अनेक सामाजिक संघटना, विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे.

मुंबई - कोरोना लॉकडाऊनमध्ये गोरगरीब आणि गरजूंना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जातोय. मात्र, शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चक्क दारुचा खंबा वाटप कार्यक्रम केलाय. या खंबा वाटप कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अनेकांनी नगरसेवकाची खिल्ली उडवली असून असा नगरसेवक आपल्या मतदारसंघात असावा, अशीही उपहासात्मक इच्छा व्यक्त केलीय. अनेकांनी थेट टीका करुन परिस्थितीचं गांभीर्य नसल्याचंही म्हटलंय. 

देशात कोरोनामुळे विदारक परिस्थिती उद्भवली असून लॉकडाऊन असल्याने लोकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे, अनेक सामाजिक संघटना, विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे. असे असताना ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चक्क मद्य वाटप केल्याने सोशल मीडियासह सर्वच स्तरातून मोठी टीका होत आहे. आमदार निरंजन डावखरे यांनीही ट्विटरवरुन या उपक्रमावर टीका केलीय.   शिवसेना आमदाराच्या कार्यालयात मद्यवाटप म्हणजे आनंद दिघेसाहेबांच्या विचारांना तिलांजली, असे ट्विट निरंजन डावखरे यांनी केलंय. 

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे परिसरातील दिपक वेतकर या नगरसेवकाने शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयातच हा दारू वाटपाचा कार्यक्रम केला. याच परिसरात राहणारे समाजसेवक प्रकाश सुर्वे यांनी याबाबत थेट ठाणे मनपा आयुक्त, ठाणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली असून या नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने करीत आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाने प्रशासनाच्या कामावर पाणी फिरवण्याचं काम केलंय. त्यामुळे, या नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय. 

हे गेल्या वर्षीचे फोटो आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो हे मागच्या वर्षीचे आहेत. आपण विडंबन करायला गेलो, मात्र विटंबना झाली. आता एक वर्षानंतर हे प्रकरण पुढे आणून माझी बदनामी केली जात आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक दीपक वेतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.  

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेliquor banदारूबंदीNiranjan Davkhareनिरंजन डावखरे