पर्यावरणप्रेमी संस्थांना केले देशी झाडांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST2021-06-06T04:29:53+5:302021-06-06T04:29:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सध्याच्या काळात पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. हे ओळखून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य ...

पर्यावरणप्रेमी संस्थांना केले देशी झाडांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सध्याच्या काळात पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. हे ओळखून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुंभार दाम्पत्याने फॉरेस्ट लाइव्ह" नर्सरी आणि "गो ग्रीन बाप्पा" यांच्यातर्फे "ग्रीन अंब्रेला", "मातृसेवा फाउंडेशन" तसेच "भारतीय स्त्री शक्ती" अशा ठाणे येथील पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांना २०० देशी रोपांचे वाटप केले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आज जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. यासाठीच "झाडे लावणे आणि ती जगवणे" हाच उद्देश मनाशी बाळगून सोनाली कुंभार आणि पंकज कुंभार यांचे "फॉरेस्ट लाइव्ह" नर्सरी आणि "गो ग्रीन बाप्पा" यांनी पिंपळ, उंबर, बहावा, करंज, जांभूळ, पारिजातक, आंबा, बेल, जास्वंद, बांबू, रतनगुंज इ. वृक्षांचे पर्यावरणप्रेमी संस्थांना वाटप केले. "फॉरेस्ट लाइव्ह" नर्सरी घर, कार्यालये येथे ऑक्सिजनचा पुरवठा करणारी, नासाने सांगितलेली इनडोअर प्लान्टस लावून सुशोभीकरणाची कामे करतात. तर "गो ग्रीन बाप्पा" हे पर्यावरण पूरक लालमाती, शाडूमाती आणि शेणखत यापासून बाप्पाची मूर्ती बनवतात. यावेळी हेमंत मढवी, शुभम कुंभार, आकाश कुंभार हेदेखील उपस्थित होते.
------------