अंधांना अन्नधान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:21+5:302021-06-01T04:30:21+5:30
-------------- -------- विनामास्क साफसफाई उल्हासनगर : शहरात पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईला सुरुवात झाली आहे. ऐन कोरोना काळात नालेसफाई करणारे कंत्राटी कामगार ...

अंधांना अन्नधान्याचे वाटप
-------------- --------
विनामास्क साफसफाई
उल्हासनगर : शहरात पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईला सुरुवात झाली आहे. ऐन कोरोना काळात नालेसफाई करणारे कंत्राटी कामगार हे मास्क, हॅण्डग्लोव्हज व गमबूट यांच्याविना ही कामे करीत आहेत. महापालिकेने अशा कंत्राटी कामगारांच्या आरोग्यासाठी साहित्य देण्याची मागणी होत आहे.
---------------------
तलवार, चाॅपरसह दोघांना अटक
उल्हासनगर : कॅम्प नं. २ भय्यासाहेब आंबेडकरनगर परिसरात रविवारी रात्री १० वाजता स्वतःकडे तलवार बाळगणाऱ्या गणेश हजारे याला पोलिसांनी अटक करून त्याच्याविराेधात गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत कॅम्प नं. ३ येथील बिंदू चौकात रविवारी रात्री ११ वाजता उभा असलेल्या पंकज करोतिया याची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चाॅपर सापडला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दाेघांकडील हत्यारे जप्त केली आहेत.
----------------------