राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फूलझाडांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST2021-06-16T04:52:32+5:302021-06-16T04:52:32+5:30

कल्याण : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात एक हजार ५३ फूलझाडांचे वाटप ...

Distribution of flowers on the occasion of Raj Thackeray's birthday | राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फूलझाडांचे वाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फूलझाडांचे वाटप

कल्याण : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात एक हजार ५३ फूलझाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी फूलझाडे घेण्यासाठी अनेक नागरिक आले होते.

मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या शहर शाखेने हा कार्यक्रम घेतला. या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, प्रकाश माने, दीपिका पेडणेकर, स्वप्ना पाटील, ज्योती खवसकर, मिलिंद म्हात्रे, दीपक शिंदे, संदीप म्हात्रे, रवींद्र गरुड, सुहास काळे, दीप्तेश नाईक, रमेश यादव, प्रदीप बावसकर, परेश भोईर, प्रेम पाटील, उदय वेळासकर, आदी उपस्थित होते.

मागील दीड वर्षे सर्वजण कोरोनामुळे त्रस्त होते. मात्र, जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. फुलेही माणसाला जगावे कसे हे शिकवितात. या भारलेल्या टवटवीत, सुगंधी, रंगीबेरंगी फुलांसारखे जीवन जगता यावे, यासाठी गुलाब, मोगरा, जास्वंद अशा फूलझाडांचे वितरण मनसेने करून चैतन्य जागृत केले.

----------------

Web Title: Distribution of flowers on the occasion of Raj Thackeray's birthday