शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नाराजांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी, 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 15:16 IST

कॉंग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा दावा

ठळक मुद्देठाण्यातील राजकीय क्षेत्रतील विविध पक्षातील पक्षप्रवेश चालु आहेत. शनिवारी मुळचे काँग्रेसचेच पण काहीसे काँग्रेसकडून दुर झालेले कळवा-मुंब्रा परिसरातील माजी महापौर नईम खान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

ठाणे  : महापालिकेत अवघ्या तीन नगरसेवकांचे पाठबळ असलेल्या कॉंग्रेसची अवस्था सध्या ठाण्यात फारशी चांगली नाही. पक्षातील पदाधिका:यांमध्येच गटबाजी आहे. अशी परिस्थिती असातांना इतर पक्षातील 25 विद्यमान नगरसेवक माङया संपर्कात असल्याचा दावा कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमधून इतर पक्षात गेलेल्या माजी महापौर नईम खान यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी शनिवारी चव्हाण यांच्या उपस्थितीत घरवापसी केली.           ठाण्यातील राजकीय क्षेत्रतील विविध पक्षातील पक्षप्रवेश चालु आहेत. शनिवारी मुळचे काँग्रेसचेच पण काहीसे काँग्रेसकडून दुर झालेले कळवा-मुंब्रा परिसरातील माजी महापौर नईम खान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले वसीम सय्यद व राजकीय विश्लेषक मो. अब्दुल्ला यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान यावेळी बोलतांना चव्हाण यांनी सांगितले की,येत्या काही दिवसांतच ठाण्यातील दिग्गज असे विविध पक्षातील पदाधिकारी/नगरसेवक हे काँग्रेस पक्षात प्रवेश घेतील असे भाकित केले आहे. विशेष म्हणजे असे दिग्गज नगरसेवक कॉंग्रेसमध्ये आले तर आगामी ठाणो महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच जागावर आम्ही  तयारी करणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. परंतु हा दावा करीत असतांनाच पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यांनतर नक्की काय ते सांगू अशी सावध भुमिकाही ते घेण्यास विसरले नाहीत. एकीकडे ठाणो शहर कॉंग्रेसच ही तीन नगरसेवकांची आहे. त्यातही या तीघांमध्येही एकमत नाही, मुंब्य्रातील एक नगरसेवक तर शिवसेनेबरोबर यापूर्वीच हातमिळवणी करुन मोकळा झाला आहे. त्यावरुन आजही शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात वादंग होतांना दिसत आहे. तसेच पक्षातील इतर पदाधिका:यांमध्येही एकमत नसल्याने गटातटाचे राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चव्हाण यांनी आता जो दावा केला होता, तो कितपत खरा ठरणारे हे आता येणारा काळच निश्चित करणार आहे.

दरम्यान नईम खान यांनी बोलताना सांगितले की,ठाणे  काँग्रेसला विक्रांत चव्हाण यांच्या रूपात सक्षम नेतृत्व मिळाले असून त्यांच्या काम करण्याची पद्धतीमूळे आगामी काळात ठाण्यातील काँग्रेस अधिकाधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेस