शाळा प्रवेशास मुदतवाढ, मोबाइल संदेश सेवा बंद झाल्याने रहावे लागले होते वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 03:21 AM2018-06-22T03:21:15+5:302018-06-22T03:21:15+5:30

आरटीई २५ टक्के अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी आॅनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या सोडतीत दोन हजार ६३७ अर्जांची निवड करण्यात आली आहे.

Disruption of school admission, mobile messaging had to have been stopped | शाळा प्रवेशास मुदतवाढ, मोबाइल संदेश सेवा बंद झाल्याने रहावे लागले होते वंचित

शाळा प्रवेशास मुदतवाढ, मोबाइल संदेश सेवा बंद झाल्याने रहावे लागले होते वंचित

Next

ठाणे : आरटीई २५ टक्के अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी आॅनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या सोडतीत दोन हजार ६३७ अर्जांची निवड करण्यात आली आहे. मात्र, मोबाइल संदेश सेवा बंद झाल्यामुळे या निवड झालेल्या अर्जदारांना शाळा प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. मात्र, आता पुन्हा मोबाइल संदेश सेवा सुरू केली असून शाळा प्रवेशासाठी देखील २५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रि या राबविण्यात येत असते. ठाणे जिल्ह्यातील ६४० कायम विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रि या राबवण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी शाळा प्रवेशाची दुसरी सोडत जाहिर करण्यात आली. यामध्ये प्ले ग्रुपसाठी ५, प्री.केजी ५१७, ज्यु.केजीसाठी ५९२ आणि इयत्ता १ ली साठी १ हजार ५२३ असे मिळून २ हजार ६३७ अर्जांची निवड करण्यात आली. त्यावेळी मोबाइल संदेश सेवा बंद असल्यामुळे केवळ १८१ जणांनीच शाळा प्रवेश घेतले होते.
मात्र, अनेक पालक मोबाइलवर संदेश प्राप्त होण्याची वाट बघत होते. परंतु, मोबाइल संदेश सेवा बंद झाल्यामुळे या निवड झालेल्या अर्जदारांपैकी २ हजार ४५६ अर्जदारांना शाळा प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. मात्र, आता पुन्हा मोबाइल संदेश सेवा सुरू करण्यात आली असून शाळा प्रवेशासाठीदेखील २५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अद्याप एवढ्या जागा शिल्लक : यात ठाणे महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत सुमारे ४२४ जागा, भिवंडी महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत २३३ जागा, अंबरनाथमध्ये २१६ जागा भरणे शिल्लक आहेत. कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत १७० , उल्हासनगर विभागांतर्गत ६२, शहापूर तालुक्यांतर्गत ५४, कल्याण ग्रामीण विभागांतर्गत ५२, भिवंडी तालुक्यांतर्गत २६, मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रात १७ तर मुरबाड तालुक्यात १२ जागा शिल्लक आहेत.
>दुसºया सोडतीनंतर १९६८ जागा रिक्त
ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाच्या आॅनलाईन प्रक्रियेची दुसरी सोडत सोमवारी जाहीर झाली. दुसºया फेरी अखेर ठाणे जिल्ह्यात सुमारे १९६८ जागा अद्यापही शिल्लक असून यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतर्गत सर्वाधिक सुमारे ७०२ जागा शिल्लक आहेत. तर आता प्रवेशासाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या सर्व जागांवर गोरगरीत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून त्यांना प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ठाणे जिल्ह्यातील ६४० कायम विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रि या राबवण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी झालेल्या सोडतीनंतरही जिल्हयात १९६८ जागा प्रवेशासाठी शिल्लक आहेत.

Web Title: Disruption of school admission, mobile messaging had to have been stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.