भिवंडीत स्वछता अभियानाचा बोजवारा; रस्त्यावर पुन्हा कचरा व घाणीचे साम्राज्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 01:57 PM2021-06-28T13:57:50+5:302021-06-28T13:58:01+5:30

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष , नागरिकांना नाक मुठीत धरून करावा लागतो प्रवास  

Disruption of sanitation campaign in Bhiwandi; Empire of garbage and dirt on the streets again | भिवंडीत स्वछता अभियानाचा बोजवारा; रस्त्यावर पुन्हा कचरा व घाणीचे साम्राज्य 

भिवंडीत स्वछता अभियानाचा बोजवारा; रस्त्यावर पुन्हा कचरा व घाणीचे साम्राज्य 

Next

- नितिन पंडीत 

भिवंडी- भिवंडी निजामपूर शहर महानग पालिकेने स्वच्छता अभियानदरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा सध्या शहरात फज्जा उडाला असून शहरातील विविध रस्त्यांवर कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने स्थानिक रहिवासी व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र या गंभीर बाबडीकडे मनपा प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याने सुज्ञ नागरिकांसह स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पालिकेच्या विविध प्रभागामध्ये नियमित कचरा उचलण्यास ठेकेदार व पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे . शहरातील अंजूरफाटा येथे रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . हा कचरा रस्त्याच्या कडेला पसरला असल्याने कचऱ्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी येत असल्याने नागरिकांची रस्त्यावरून प्रवास करताना मोठी गैरसोय होत असून स्थानिकांना नाक मुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे . 

भिवंडी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया हे शहर स्वच्छतेसाठी अतोनात प्रयत्न करत असतांना मनपाचे काही कर्मचारी व अधिकारी मात्र शहराच्या स्वच्छ भारत अभियानालाच तिलांजली देण्याचे काम करत असल्याने शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर अशा प्रकारे कचऱ्याचे मोठं मोठे ढीग साचत आहेत.

विशेष म्हणजे शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकाळी व रात्री अशा दोन पाळयात कचरा उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे देखील पुरता दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहेत. या दुर्लक्षित कारभारा मुळे शहरात केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे आदेशाचे तीन तेरा वाजले आहेत. या प्रकरणी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दरमहा कचरा उचलणाऱ्या घंटा गाडी ठेकेदारावर सुमारे ९० लाख रुपये खर्च करीत आहे, असे असताना स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे शहरात अनेक ठिकाणी ठेकेदारा कडुन नियमित कचरा उचला जात नसल्याच्या अनेक ताकजररी नागरिक वेळोवेळी करीत आहेत . तसेच ,औषध फवारणी देखील वेळेवर होत नसल्याने कचऱ्यामुळे नागरिकांना अरोडायच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Disruption of sanitation campaign in Bhiwandi; Empire of garbage and dirt on the streets again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app