लोकलचे दरवाजे न उघडल्याने दिव्यात गोंधळ

By Admin | Updated: June 28, 2017 03:21 IST2017-06-28T03:21:28+5:302017-06-28T03:21:28+5:30

दिव्यात मंगळवारी सकाळी ८.०८ च्या कसारा-सीएसटी जलद लोकलचे दरवाजे न उघडल्याने स्थानकात प्रचंड गोंधळ झाला. दिवा प्रवासी

Disruption of the door without opening the door | लोकलचे दरवाजे न उघडल्याने दिव्यात गोंधळ

लोकलचे दरवाजे न उघडल्याने दिव्यात गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दिव्यात मंगळवारी सकाळी ८.०८ च्या कसारा-सीएसटी जलद लोकलचे दरवाजे न उघडल्याने स्थानकात प्रचंड गोंधळ झाला. दिवा प्रवासी संघटनेने फलाट क्रमांक ४ वर आरपीएफ जवान तैनात करण्याची मागणी केली.
तीन दिवसांच्या सुट्टयांनंतर चाकरमानी कामावर निघाले होते. त्यातच दिव्यातील चाकरमानी सकाळी ८.०८ च्या कसारा-सीएसटी जलद लोकल पडण्यासाठी दिवा स्थानकात आली. तेव्हा जोरदार पाऊस पडत होता. लोकल थांबल्यावर आतील प्रवाशांनी दरवाजे न उघडल्याने एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, त्यानंतर जलद लोकल एक तासाने असल्याने प्रवाशांनी यावेळी संताप व्यक्त केला. त्यामुळे तेथे आरपीएफ जवान तैनात करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Disruption of the door without opening the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.