शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे दोन नगरसेवक भिडले, तलाव सुशोभीकरणाच्या प्रस्तावावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 01:05 IST

तलाव सुशोभीकरणाच्या प्रस्तावावरून सोमवारच्या महासभेत चांगलाच वादंग झाला.

ठाणे - घोडबंदर भागातील कासारावडवली येथील तलाव सुशोभीकरणाच्या प्रस्तावावरून सोमवारच्या महासभेत चांगलाच वादंग झाला. या तलावासाठी यापूर्वीदेखील तीन वेळा खर्च केल्याचा मुद्दा यावेळी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी उपस्थित केला. तसेच ३६ तलावांच्या सुशोभिकरणामध्येही हा तलाव घेतला आहे. त्यामुळे एकाच तलावासाठी पुन्हा आठ कोटींचा खर्च कशासाठी असा सवाल करून या ठिकाणी जाणारे रस्ते, पायवाटा आदींची सोय करा,मगच तलाव सुशोभित करा असा मुद्दा त्यांनी लावून धरला. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी हा प्रस्ताव मंजूर करावा,अशी मागणी केली. त्यामुळे शिवसेनेच्या या दोन नगरसेवकांमध्ये चांगलेच घुमशान रंगले. अखेर यावर महापौरांच्या दालनात बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी केल्याने हा वाद तात्पुरत्या स्वरुपात शमल्याचे दिसून आले.आमदार प्रताप सरनाईक यांनी तलाव शुद्धीकरण आणि सौंर्दयीकरणाची मोहीम काही महिन्यांपूर्वी हाती घेतली होती. त्या अनुषगांने त्यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत या तलावाच्या शुद्धीकरण व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मांडला होता . त्यावेळी आयुक्तांनी या मोहिमेला महानगरपालिका सर्वोतोपरी सहकार्य करेन, असे आश्वासन दिले. त्यानुसार हा प्रस्ताव सोमवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला. मात्र, यापूर्वीदेखील तीन वेळा या तलावाच्या सुशोभिकरणासाठी खर्च केल्याचा धक्कादायक आरोपओवळेकर यांनी केला. तसेच, ३६ तलावांच्या सुशोभिकरणातही हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकाच तलावासाठी आणखी ८ कोटींचा खर्च कशासाठी असा सवालही त्यांनी केला. दुसरीकडे आधीच्या कामाचा खर्च झालेला नसल्याचे सांगून सध्या वर्कआॅडर दिल्याचे मान्य केल्यामुळे प्रशासनसुद्धा अडचणीत सापडले. मात्र,येथील रस्ता चांगला असल्याचा दावा त्यांच्याच पक्षातील नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी केला. त्यामुळे रस्ता चांगला नाही, हा मुद्दाच चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. या मुद्यावरून हे दोन नगरसेवक आपसात चांगलेच भिडले. अखेर यावर महापौरांच्या दालनात बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे यांनी केली. त्यानंतर या वादासतूर्तास विराम देण्यात आला.महाविकास आघाडीच्या घटक पक्षात बाचाबाचीहा वाद थांबतो नाही तोच महासभेची वेळ संपत येत असल्याचे लक्षात येताच, नगरसेवकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आणि बांधकाम विभागाशी संबधींत असलेले प्रस्ताव मंजूर करावेत, अशी सुचना राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली. तसेच पाणी विभाग आणि इतर विभागाच्या संबधींत असलेले विषयही मंजूर करावेत अशी मागणीही काही नगरसेवकांनी केली.त्यानुसार महापौरांनी त्या अनुषगांने रुलींग देऊन तसे प्रस्ताव मंजूर करून महासभा संपल्याचे जाहिर करण्याचा प्रयत्न केला. परंतु,यावेळी काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेचे अर्थात महाविकास आघाडीचे नगरसेवक आमने सामने आल्याचे दिसून आले. आम्ही केवळ सुचना केली होती. निर्णय घेण्यासाठी चर्चा झाली पाहिजे, असा सूर राष्टÑवादीने लावून धरला. तसेच विषयांचे वाचन नसतांना मंजूर कसे असा सवाल करून काँगे्रसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आक्षेप घेतला. यावरून महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक यांची राष्टÑवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे दिसून आले. अखेर ही सभा स्थगित केल्याचे प्रशासनाला सांगावे लागले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेShiv Senaशिवसेना