शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

क्लस्टर सीमांकनाचा वाद पुन्हा उफाळला, विस्तारित सीमांकन झालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 2:51 AM

ठाणे शहरातील पाच ठिकाणांचा क्लस्टरचा आराखडा गुरुवारी महासभेत मंजूर करण्यात आला. या योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

ठाणे  - शहरातील पाच ठिकाणांचा क्लस्टरचा आराखडा गुरुवारी महासभेत मंजूर करण्यात आला. या योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. परंतु, असे असताना आता क्लस्टरचा नवीन वाद निर्माण झाला आहे. महसूलमंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात क्लस्टर राबवण्याची पालिकेला घाई झाल्याचा आरोप गावठाण आणि कोळीवाड्यातील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे महसूल विभाग व भूमापन विभागाने करावयाचे सीमांकनाचे काम ठाणे महापालिका प्रशासनाने क्लस्टर राबवण्यासाठी घाईघाईने चालू केल्याची माहिती या भूमिपुत्रांनी दिली आहे.कोळीवाडा व गावठाणांचे विस्तारित सीमांकन झाले नसताना श्रेय लाटण्यासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाने क्लस्टरचे सुधारित प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी मांडले होते. त्याला सभागृहाने एकमताने मंजुरीसुद्धा दिली आहे. परंतु, हे कायद्याला धरून नसल्याचा मुद्दा गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी केला आहे. ठाण्यातील भूमिपुत्रांनी याबाबतचे सविस्तर निवेदन १७ डिसेंबर रोजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना दिले होते. त्यावर सविस्तर चर्चासुद्धा केली होती. या प्रस्तावाला स्थगिती द्या, अशी विनंती त्याचवेळी करण्यात आली होती. परंतु, असे असताना महासभेत क्लस्टरचा प्रस्ताव मंजूर कसा झाला, असा प्रश्न ठाणे गावठाण कोळीवाडे, पाडे संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आला आहे.कोपरी व राबोडी परिसरात कोळीवाडे गावठाणात येत असून त्याचे महसूल विभागामार्फत व भूनगरमापन विभागाकडून विस्तारित सीमांकन झालेच नाही. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही ते लवकरात लवकर व्हावे, ही कोळीवाडा व गावठाण यांची मागणी शासनाकडे आजही प्रलंबित आहे.हद्द निश्चित करण्याचे काम पालिकेचे नसून ते महसूल व भूमापन विभागाचे आहे. संबंधित विभागाने कोळीवाडा व गावठाण यांचे विस्तारित सीमांकन केलेच नाही, तर पालिका प्रशासनाने क्लस्टरचा सुधारित प्रस्ताव बनवलाच कसा, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.यासंदर्भात समितीचे सदस्य गिरीश साळगावकर म्हणाले की, सीमांकन झाल्याशिवाय क्लस्टरच्या प्रकल्पाला मंजुरी देणे चुकीचे आहे. याविरोधात शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणे