तंटामुक्तीने मिटला आई मुलामधील वाद

By Admin | Updated: June 22, 2016 01:46 IST2016-06-22T01:46:25+5:302016-06-22T01:46:25+5:30

सासू- सुनेतील वादाचे पर्यावसन आई आणि मुलामधील भांडणात होऊन अखेर भांडण पोलिसांपर्यंत गेले. मात्र याप्रकरणी चिखले तंटामुक्ती समितीच्या हस्तक्षेपाने समेट घडून या वादावर पडदा पडला आहे.

Dispute between the mother | तंटामुक्तीने मिटला आई मुलामधील वाद

तंटामुक्तीने मिटला आई मुलामधील वाद

डहाणू/बोर्डी : सासू- सुनेतील वादाचे पर्यावसन आई आणि मुलामधील भांडणात होऊन अखेर भांडण पोलिसांपर्यंत गेले. मात्र याप्रकरणी चिखले तंटामुक्ती समितीच्या हस्तक्षेपाने समेट घडून या वादावर पडदा पडला आहे.
चिखले गावातील रतन काळू तुंबडा या आदिवासी महिलेचे सुने बरोबर नेहमी भांडण व्हायचे. गेल्या काही महिन्यांपासून दोघींमधील धुसफूस वाढून एकमेकींवर जादूटोणा केल्याचे आरोप करण्यात येत होते. रतन हिचा विवाहित मुलगा प्रकाश तुंबडा हा खलाशाचे काम करीत असून मासेमारी हंगाम संपल्याने ३ ते ४ महिन्यांनी घरी आला. त्यानंतर या भांडणाचे स्वरूप आई विरुद्ध मुलगा असे झाले. हा वाद पुढे पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला.
घोलवड पोलिसांनी हे प्रकरण चिखले तंटामुक्त समितीकडे वर्ग केले. दरम्यान, या समितीचे अध्यक्ष बच्चूभाई माच्छी, यज्ञेश पाटील, अशोक किणी, शरद पाटील, अनिरुद्ध पाटील या सदस्यांनी तुंबडा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या नातेसंबंधातील आत्मीयता सांगितली शिवाय जादूटोण्याच्या आरोपामुळे होणारे कायदेशीर परिणाम व शिक्षा या बद्दल समज दिली. भोंदुबाबा स्वार्थासाठी फसवणूक करतो हेही पटवून दिले. (वार्ताहर)

Web Title: Dispute between the mother