शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये ठाण्यात ‘पद्मावत’ प्रदर्शित: पहिल्या दिवशी पे्रक्षकसंख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:06 IST

‘पद्मावत’ या चित्रपटाला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून ठाण्यातील विविध सिनेमागृहांमध्ये तो प्रदर्शित झाला. अनेकांनी दबक्या पावलांनीच सिनेमागृहात प्रवेश करुन ‘पद्मवात’ पाहण्याचा आनंद लुटला.

ठळक मुद्देविरोधाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात तणावक्षत्रिय सेनेचा मात्र विरोध कायमठाण्यातील सर्वच सिनेमागृहांबाहेर प्रेक्षकांबरोबर पोलिसही सामील

ठाणे : संपूर्ण देशभरात प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी तणावपूर्ण वातावरणात ठाणे शहरात प्रदर्शित झाला. चित्रपटाला काही ठरावीक संघटनांनी केलेला विरोध लक्षात घेता ठाण्यातील सर्वच सिनेमागृहांबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.चित्रपटाला झालेल्या विरोधामुळे या चित्रपटाच्या प्रेक्षकांची संख्याही रोडावल्याचे चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. अनेक प्रेक्षकांनी पोलीस बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृहाच्या बाहेरूनच काढता पाय घेतला. कोरम मॉलमधील चित्रपटगृहात गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अवघे तीनच प्रेक्षक असल्यामुळे सकाळी ९ चा खेळ बंद करण्याची नामुश्की सिनेमागृहचालकावर आली. ठाण्यातील बहुतेक सिनेमागृहे मल्टीप्लेक्स झाली असून या सर्वच सिनेमागृहांबाहेर सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. बुधवारी क्षत्रिय सेनेच्या वतीने सिनेमाला जोरदार विरोध करण्यात आला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे क्षत्रिय समाजाच्या वतीने ठाण्यातील कोणत्याही सिनेमागृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर, कोरम मॉलच्या बाहेर मूक निदर्शने करून चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले. या सर्वच पार्श्वभूमीवर प्रेक्षकांची झडती घेऊनच त्यांना सिनेमागृहांमध्ये पोलिसांकडून सोडण्यात येत होते. कोरम मॉलमधील सकाळी ९ नंतरच्या शो ला प्रेक्षकांची ब-यापैकी गर्दी जमली होती.चित्रपटामध्ये काहीच वादग्रस्त नसल्याची प्रतिक्रि या इटर्निटीमधून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांनी व्यक्त केली. बºयाच प्रेक्षकांनी तर हा एक प्रकारे पब्लिसिटी स्टंट असल्याचेही मत व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेcinemaसिनेमाPoliceपोलिस