ज्ञानसाधनाच्या ‘बिईंग मी’ मोहिमेच्या पहिल्या उपक्रमात स्त्रियांच्या आजारांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:10+5:302021-03-21T04:40:10+5:30
ठाणे : महिलांच्या आरोग्यासंदर्भात सकारात्मक प्रभावासाठी महिलांसाठी पोषण शिक्षण, योग-शिक्षण, विविध व्याधींबाबत आवश्यक ज्ञान देणे आणि रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा ...

ज्ञानसाधनाच्या ‘बिईंग मी’ मोहिमेच्या पहिल्या उपक्रमात स्त्रियांच्या आजारांवर चर्चा
ठाणे : महिलांच्या आरोग्यासंदर्भात सकारात्मक प्रभावासाठी महिलांसाठी पोषण शिक्षण, योग-शिक्षण, विविध व्याधींबाबत आवश्यक ज्ञान देणे आणि रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘वुमन्स डेव्हलपमेंट सेल’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बिईंग मी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या पहिल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्त्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गौरी वालामे यांनी केले.
‘आय कॅन सरवाईव्ह’ या मथळ्याअंतर्गत स्त्रियांसंबंधीच्या गंभीर आजार या मुद्द्याला अनुसरून त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘पीसीओडी’ व ‘गर्भाशयाच्या ग्रीवाचा कर्करोग’ या स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या गंभीर आजारांवरील उपचारपद्धतीविषयी विवेचन केले. शारीरिक व मानसिक असंतुलन व ताण-तणावग्रस्त जीवनपद्धती ही या आजारांची कारणे असतात, असे त्या म्हणाल्या.‘बिईंग मी’ कार्यक्रम प्रमुख उपप्राचार्या डॉ. मृणाल बकाणे यांनी प्रास्ताविक केले. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण ६५ शिक्षिका आणि ५०७ विद्यार्थिनींनी ‘एम.एस.टीम’च्या साहाय्याने या ऑनलाइन कार्यक्रमाचा लाभ घेतला.
--------------------------------