Thane: उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदार आयलानी यांच्यात चर्चा
By सदानंद नाईक | Updated: March 22, 2024 20:52 IST2024-03-22T20:51:37+5:302024-03-22T20:52:13+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर : शहरातील रस्त्याची दुरुस्ती, खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, पाणी टंचाई आदी समस्याबाबत आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेतली.

Thane: उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदार आयलानी यांच्यात चर्चा
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील रस्त्याची दुरुस्ती, खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, पाणी टंचाई आदी समस्याबाबत आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेतली. भाजपच्या शिष्टमंडळात शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, चंद्रकांत मिश्रा, जय कल्याणी, राजेश वधारीया आदीजन उपस्थित होते.
उल्हासनगरात रस्ते भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदले जात असल्याने, रस्त्याची दुरवस्था होऊन रस्ते धुळीने माखले आहे. खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतील मुख्य रस्त्याची पुनर्बांधणी, प्रमुख गार्डनची साफसफाई, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, पाणी टंचाई दूर करणे, मुख्य रस्त्याची दुरुस्ती आदी मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन चर्चां केली. आयुक्त अजीज शेख यांनी पावसाळ्यापूर्वी विकास कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती प्रदीप रामचंदानी यांनी दिली आहे.