उल्हासनगरातील विकास कामाबाबत महायुती नेते व आयुक्ता मध्ये चर्चा, पाणी टँकर मोफतची मागणी
By सदानंद नाईक | Updated: April 1, 2025 18:14 IST2025-04-01T18:14:01+5:302025-04-01T18:14:33+5:30
शहरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन चर्चा केली.

उल्हासनगरातील विकास कामाबाबत महायुती नेते व आयुक्ता मध्ये चर्चा, पाणी टँकर मोफतची मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणीपट्टी कर दरवाढ रद्द करून मोफत पाणी टँकर देण्याची मागणी केली. चर्चेला आमदार कुमार आयलानी यांच्यासह शिवसेननेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, रमेश चव्हाण, नाना बागुल, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासह महायुतीचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
उल्हासनगरात भुयारी गटार योजना, ७ मुख्य रस्ते, पाणी पुरवठा योजनेसह नागरी सुविधा निधी वा महापालिका निधीतून असंख्य विकास कामे सुरु आहेत. या सर्व विकास कामाचा आढावा घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मंगळवारी दुपारी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली. यावेळी आमदार कुमार आयलानी, भाजपा जिलाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, महेश सुखरमानी, राजेश वधारिया, शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेन्द्र चौधरी, उपजिल्हाध्यक्ष अरुण आशान, रमेश चव्हाण, दिलीप गायकवाड़, कलवंत सिंग सोहेता, रिपाईचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल, स्वप्निल बागुल, राजू जग्यासी, टोनी सिरवानी, लाल पंजाबी, रामचार्ली पारवानी, शांताराम निकम आदिजण उपस्थित होते. पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याची मागणी यावेळी करून पाणी टँकरवर वाढीव शुल्क माफ करून मोफत पाणी टँकर पुरविण्याची मागणी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे कांक्रीटीकरण करने, रस्त्यातील खड्डे भरणे, रस्ते डिव्हायडरचे सुंदरीकरण व स्पीड ब्रेकवर पांढरे पट्टे मारने, हॉकर्स झोन निश्चित करणे, सीसीटीव्हीसाठी खोदलेले रस्ते दूरस्त करणे, सर्वे नंबर-१८८ वर डंपिंग ग्राउंड, महापालिका मालमत्ता ताब्यात घेऊन सनद काढणे, नाले सफाई आदी कामाकडे महायुतीच्या नेत्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांचे लक्ष केंद्रित केले. तसेच शहरांत सुरु असलेल्या भुयारी गटारीच्या कामाबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली.