अर्धा तास भरून देण्याची शासकीय कर्मचाऱ्यांना सवलत
By Admin | Updated: August 19, 2015 23:53 IST2015-08-19T23:53:18+5:302015-08-19T23:53:18+5:30
राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांत काम करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी १५ मिनिटांनी उशिरा येण्याची

अर्धा तास भरून देण्याची शासकीय कर्मचाऱ्यांना सवलत
भार्इंदर : राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांत काम करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी १५ मिनिटांनी उशिरा येण्याची सवलत मिळाली होती. १ आॅगस्टपासून त्यात अर्ध्या तासाची वाढ केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना गाडी लेट अथवा वाहतूककोंडीचे कारण देता येणार नसून देण्यात आलेली सवलत कार्यालयीन वेळेत भरुन काढण्याचेही बंधनकारक केले आहे.
शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यालयांत काम करणारे अनेक कर्मचारी कार्यालयीन क्षेत्राबाहेरील शहरांसह लांबून येत असतात. त्यामुळे त्यांना वेळेवर कामावर हजर राहण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यातही अनेकदा वाहतुकीचा अडथळा निर्माण झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने ३१ आॅगस्ट १९८८ च्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना कामावर येतेवेळी प्रवासात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास १५ मिनिटांची सवलत दिली होती. तसेच एका महिन्यात सवलतीच्या वेळेखेरीज सतत दोन वेळा उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची नैमत्तिक रजा कापली जात असे. ही सवलत जानेवारी २०१५ पासून लागू करण्याचे निर्देश असले तरी अंमलबजावणी १ आॅगस्ट पासून झाली आहे. (प्रतिनिधी)