आईपर्यंत जेवणाचा डबा पोहोचलाच नाही
By Admin | Updated: December 31, 2014 01:00 IST2014-12-31T01:00:47+5:302014-12-31T01:00:47+5:30
तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी घेऊन जाताना वाटेतच मृत्यूने गाठल्याची श्रावणबाळाची कथा सर्वांनाचा माहित आहे. अशीच काहीशी दुर्देवी घटना मंगळवारी सायन येथे घडली.

आईपर्यंत जेवणाचा डबा पोहोचलाच नाही
नवी मुंबई : तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी घेऊन जाताना वाटेतच मृत्यूने गाठल्याची श्रावणबाळाची कथा सर्वांनाचा माहित आहे. अशीच काहीशी दुर्देवी घटना मंगळवारी सायन येथे घडली. के. ई. एम रुग्णालयात उपाचार घेणाऱ्या आईसाठी जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या शेखर भावळे या तरूणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. मुलाच्या वाटेकडे डोळेलावून बसलेल्या आईला मृत्यूी वार्ता ऐकावी लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. या घटनेने आईला जबर धक्का बसला.
कोपरखैरणे सेक्टर ८ येथे शेखर भावळे सहकुटुंब राहायला होता. आईला गुडघे दुखीचा त्रास असल्याने त्याने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयात दाखल केले होते. नुकतीच गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. आईसाठी शेखर दररोज घरून जेवणाचा डबा घेवून जायचा. परंतु मंगळवारी या मातेपर्यंत डबा पोहोचलाच नाही. शेखर नेहमीप्रमाणे सकाळी जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकलवरून मुंबईकडे निघाला. तो सायन येथे आला असता त्याची मोटरसायकल व्होल्वो बसला धडकली. यात बसच्या चाकाखाली सापडल्याने शेखरचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री त्याच्यावर कोपरखैरणे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे तो अनेकांना परिचित होता. त्यामुळे त्याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
च्गेले काही दिवस दररोज डबा घेऊन जाणाऱ्या शेखरबाबत मंगळवारी नियतीच्या मनात वेगळाच खेळ सुरू होता.
च्नेहमीप्रमाणे शेखर कोपरखैरणेतून जेवणाचा डबा घेऊन मोटारसायकलने निघाला खरा मात्र सायन त्याची मोटारसायकल व्होल्वो बसला धडकली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
च्डब्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेखरच्या आईपर्यंत काळजाला चटका देणारी मुलाच्या मृत्यूचीच बातमी पोहोचली.
च् शेखरच्या जाण्याने भावळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेखर कुटुंबातील कमवता मुलगा होता.