शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

डिम्पल मेहता होणार महापौर; यंदाचे महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 04:54 IST

मीरा भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत ६१ जागा जिंकून एकहाती सत्ता आणणा-या भाजपात महापौरपदासाठी आमदार नरेंद्र मेहता यांचे धाकटे बंधू विनोद यांच्या नगरसेविका पत्नी डिम्पल मेहता यांचेच नाव आघाडीवर आहे.

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत ६१ जागा जिंकून एकहाती सत्ता आणणाºया भाजपात महापौरपदासाठी आमदार नरेंद्र मेहता यांचे धाकटे बंधू विनोद यांच्या नगरसेविका पत्नी डिम्पल मेहता यांचेच नाव आघाडीवर आहे. डिंपल या प्रभाग १२ मधून निवडून आल्या आहेत.यंदाचे महापौरपद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. आमदार मेहता हे भाजपाच्या विजयाचे शिल्पकार ठरल्याने महापौरपद आपल्या कुटुंबात ठेवण्याची त्यांची मागणी पक्ष अव्हेरणार नाही. त्यामुळे पक्षातील इतर स्पर्धकांपेक्षा डिम्पल यांचेच पारडे जड आहे. गीता जैन यांना महापौर करण्यात आल्यानंतर अनेक विषयांवरुन दोघांत वाद होत होते. शिवाय स्वत: महापौर असताना मेहता यांचे त्यावेळी गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्याशी बिनसले होते. निर्मला सावळे महापौर असतानाही तोच प्रकार होता.पालिकेत डिम्पल यांना महापौर म्हणून बसवण्यामागे आ. मेहतांनी अनेक फायद्यांचा विचार केल्याची शक्यता आहे. कारण मानाचे महापौरपद आपल्याकडे ठेवतानाच पालिकेतील कारभारही त्यांना हवा तसा चालवणे सोपे जाईल. डिम्पल या २०१२ मध्ये निवडून आल्या होत्या. नंतर त्यांना महिला-बालकल्याणचे सभापतीही केले होते.- भाजपाच्या दोन वेळा निवडून आलेल्या नगरसेविका कल्पना म्हात्रे याही दावेदार मानल्या जात होत्या. परंतु त्यांचा पत्ता कापण्यात आल्याने डिम्पल यांचा मार्ग मोकळा झाला. वंदना मंगेश पाटील, ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील, डॉ. प्रिती पाटील, सुनिता भोईर, नयना म्हात्रे आदी नगरसेविकाही महापौरपदासाठी दावा करून मेहता यांना नाराज करतील, अशी शक्यता नाही.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक