नव्या पोलीस वसाहतीमधील इमारतींची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:41+5:302021-03-21T04:39:41+5:30
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत नव्या पोलीस वसाहतीमधील इमारतींची अवघ्या दहा वर्षांतच दुरवस्था झाली असून, स्वच्छतागृह मधील ...

नव्या पोलीस वसाहतीमधील इमारतींची दुरवस्था
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत नव्या पोलीस वसाहतीमधील इमारतींची अवघ्या दहा वर्षांतच दुरवस्था झाली असून, स्वच्छतागृह मधील गळकी छते, फुटलेल्या मलनिसारण वाहिन्या, भिंतीचा ओलावा, गढूळ पाणी व अनियमित पाणीपुरवठा यांसारख्या समस्यांचा सामना वसाहतीमधील पोलीस कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे या वसाहतीची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी धर्मराज्य पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पोलीस आयुक्तालय शेजारी, दहा वर्षांपूर्वी पाच १५ मजली इमारती बांधण्यात आल्या. मात्र, गेल्या दहा वर्षांतच त्यांची दुर्दशा झालेली असून पोलीस कर्मचाऱ्यांना दरदिवशी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वसाहतीमधील जवळजवळ सर्वच इमारतींमधील घरांच्या भिंतींना ओलावा येणे, स्वच्छतागृह मधील प्लास्टर पडणे, सिलिंगचे प्लास्टर कोसळणे, भिंतींना भेगा पडणे यांसारखे प्रकार सुरू झालेले आहेत. मलनिसारणवाहिनी फुटलेली असल्यामुळे संपूर्ण वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरून पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या ही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पक्षाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.